वीजनिर्मिती केंद्राच्या अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 21:38 IST2021-03-28T21:38:50+5:302021-03-28T21:38:56+5:30
पाच कर्मचारी देखील पॉझिटिव्ह

वीजनिर्मिती केंद्राच्या अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू
दीपनगर : येथील वीजनिर्मिती केंद्राच्या नवीन प्रकल्पातील उपकार्यकारी अभियंता देवेश गजानन भावसार (३८) यांचा शनिवारी उपचारादरम्यान जळगाव येथील खाजगी रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला. ज्या विभागात उपकार्यकारी अभियंता म्हणून भावसार होते त्याच विभागातील पाच कर्मचारी देखील पॉझिटिव्ह आले आहेत. तर १८ रोजीच दीपनगर प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिपनगर येथील रुग्णालयात कोरोनाची लस उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून वीजनिर्मितीची अत्यावश्यक सेवा देताना सदर आजाराचा प्रसार न होता वीज निर्मिती संच अविरत सुरू ठेवण्यास बाधा येणार नाही, अशी मागणी दीपनगर मुख्य अभियंत्यांनी केली आहे.