रोटरी क्लब आॅफ भुसावळतर्फे कोरोना कर्मयोगींचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 15:04 IST2020-07-30T15:04:13+5:302020-07-30T15:04:35+5:30
कोरोनाच्या कठीण परिस्थितीत रुग्णांची सेवा स्वत:च्या जीवाची परवा न करता आपले कर्तव्य बजावणाऱ्या सेंटर रेल्वे हॉस्पिटलच्या सर्व सिस्टरचा त्यांच्या उत्तम सेवेसाठी रोटरी क्लब आॅफ भुसावळतर्फे सन्मान करण्यात आला.

रोटरी क्लब आॅफ भुसावळतर्फे कोरोना कर्मयोगींचा सन्मान
भुसावळ, जि.जळगाव : कोरोनाच्या कठीण परिस्थितीत रुग्णांची सेवा स्वत:च्या जीवाची परवा न करता आपले कर्तव्य बजावणाऱ्या सेंटर रेल्वे हॉस्पिटलच्या परिचारिका सिस्टर तिरके, सिस्टर रामवती, सिस्टर करुणा आणि आयसोलेशन वार्डमधील सर्व सिस्टरचा त्यांच्या उत्तम सेवेसाठी रोटरी क्लब आॅफ भुसावळतर्फे सन्मान करण्यात आला.
रोटरीचे प्रेसिडेंट जी.आर. ठाकूर यांच्या हस्ते एक बेडशीट, सॅनिटायझर बॉटल, मास्क व एक सर्टिफिकेट देऊन १५ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे दहा कॅज्युअल लेबर कर्मचारी सफाई कामगार यांचाही गौरव करण्यात आला. याप्रसंगी डॉ.शंकर, अबुस्कर व डॉ.विक्रांत सोनार हजर होते. या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन राधेश्याम भाऊ लाहोटी होते.
याप्रसंगी रोटरीयन सतीश अग्रवाल, राजेश अग्रवाल, महेश भराडे आणि आरती चौधरी उपस्थित होते.