कोरोना शतकाची हॅट्रीक ! नवीन १३० कोरोना बाधित रूग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 20:14 IST2020-06-11T18:49:40+5:302020-06-11T20:14:01+5:30
जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे़ गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ ...

कोरोना शतकाची हॅट्रीक ! नवीन १३० कोरोना बाधित रूग्ण आढळले
जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे़ गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे़ जिल्ह्यात मंगळवारी ११६ तर बुधवारी ११४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आता गुरूवारी पुन्हा एका दिवसात तब्बल १३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील २०, जळगाव ग्रामीण ०५, भुसावळ ०५, अमळनेर ०३, चोपडा १५, पाचोरा ०३, भडगाव ०२, धरणगाव २२, यावल ०२, एरंडोल ०१, जामनेर १८, रावेर २१, पारोळा ०९, बोदवड ०४ रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या १५२६ इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.