विद्यापीठातील १२ कर्मचा-यांना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:16 IST2021-03-18T04:16:24+5:302021-03-18T04:16:24+5:30

जळगाव : कोरोनाचा संसर्ग थांबता थांबत नाहीये़ बुधवारी एकाच दिवसात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील बारा कर्मचाऱ्यांचा कोरोना ...

Corona to 12 university employees | विद्यापीठातील १२ कर्मचा-यांना कोरोना

विद्यापीठातील १२ कर्मचा-यांना कोरोना

जळगाव : कोरोनाचा संसर्ग थांबता थांबत नाहीये़ बुधवारी एकाच दिवसात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील बारा कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला, असल्याची माहिती समोर आली आहे.

मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूने जळगाव जिल्ह्यासह शहरात थैैमान घातले आहे. परिणामी, दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. काही दिवसांपूर्वी विद्यापीठातील एका बँकेतील महिला अधिकाऱ्याला कोरोना लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता बुधवारी पुन्हा विद्यापीठातील बारा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. यात विद्यापीठातील वित्त विभागातील २, परीक्षा विभागातील ५ तसेच प्रशासन विभागातील २, विधी विभागातील १ तसेच पाणी पुरवठा विभागातील २ कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती विद्यापीठ सूत्राकडून मिळाली आहे.

Web Title: Corona to 12 university employees