सहकारच्या निवडणुका आता ३१ मार्चनंतरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:15 IST2021-01-18T04:15:10+5:302021-01-18T04:15:10+5:30
शासनाचा निर्णय : लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - कोरोनाचा प्रादुर्भावामुळे मार्च २०२० ते सप्टेंबर २०२० पर्यंत मुदत संपलेल्या सहकारी ...

सहकारच्या निवडणुका आता ३१ मार्चनंतरच
शासनाचा निर्णय :
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - कोरोनाचा प्रादुर्भावामुळे मार्च २०२० ते सप्टेंबर २०२० पर्यंत मुदत संपलेल्या सहकारी संस्थाच्या निवडणुका या ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच जात असल्याने या निवडणुका १७ मार्चपर्यंत ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, शासनाने आता पुन्हा सहकारी संस्थाच्या निवडणुकांना ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली असून, आता मुदत संपलेल्या सहकारी संस्थाच्या निवडणुका ३१ मार्चनंतरच होणार आहेत.
जिल्ह्यातील मोठ्या सहकारी संस्थाचा कार्यकाळ गेल्यावर्षी संपुष्टात आला होता. मात्र, कोरोनामुळे या निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. मुदत संपलेल्या सहकारी संस्थामध्ये जिल्हा सहकारी बँक, ग.स.सोसायटी, मराठा विद्या प्रसारक मंडळ, दूध फेडरेशनसह कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश आहे. यासह शेतकी संघाचाही यामध्ये समावेश आहे. यासह जिल्ह्यातील विविध कार्यकारी विकास सोसायट्यांचा निवडणुका देखील थांबल्या आहेत. आता या सर्व निवडणुका ३१ मार्चनंतरच होणार आहेत.