लसीकरणाला पुन्हा ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST2021-07-22T04:12:33+5:302021-07-22T04:12:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे डोस कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. हीच परिस्थिती ...

लसीकरणाला पुन्हा ठणठणाट
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे डोस कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. हीच परिस्थिती आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. शहरातील महापालिकेचे लसीकरण केंद्र गुरुवारी बंद राहतील. फक्त चेतनदास मेहता रुग्णालयात १८ वर्षांवरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन लसीचा डोस उपलब्ध आहे. त्याशिवाय शहरातील इतर केंद्रांवर लस उपलब्ध नाही.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून लसीकरणाला खीळ बसली आहे. मंगळवारी आणि बुधवारीदेखील जिल्ह्यात लसीकरण थंडावले आहे. गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात सर्वच लसीकरण केंद्रांवर लसींचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अनेकांना दुसरा डोसदेखील मिळू शकलेला नाही.
शुक्रवारी लसीचे डोस मिळण्याची शक्यता
जिल्ह्याला गुरुवारीदेखील नवे डोस मिळू शकणार नाही. मात्र शुक्रवारी दुपारपर्यंत जिल्ह्याला लसींचे नवे डोस मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर शनिवारी जिल्हाभरात लसीकरणाला सुरुवात होऊ शकते.