आज ऑनलाईन दीक्षांत समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:11 IST2021-05-03T04:11:54+5:302021-05-03T04:11:54+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा एकोणतिसावा दीक्षांत समारंभ सोमवार, ३ मे रोजी ऑनलाईन पध्दतीने होत ...

आज ऑनलाईन दीक्षांत समारंभ
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा एकोणतिसावा दीक्षांत समारंभ सोमवार, ३ मे रोजी ऑनलाईन पध्दतीने होत असून कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात हा ऑनलाईन समारंभ होत असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी स्नातकांना उद्देशून ऑनलाईन दीक्षांत भाषण करणार आहेत. कुलपती व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री हे दोन्ही मान्यवर दीक्षांत समारंभातील पदवीधारकांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. यावेळी प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन, प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार, प्रभारी कुलसचिव डॉ.शामकांत भादलीकर, संचालक,परीक्षा व मूल्यमापन मंडळ बी.पी.पाटील हे उपस्थित राहतील.