संमेलनाचा निधी आत्महत्याग्रस्त शेतक:यांना

By Admin | Updated: November 21, 2015 00:40 IST2015-11-21T00:40:22+5:302015-11-21T00:40:22+5:30

अखिल भारतीय साहित्य संमेलनात गोळा होणारा 50-60 लाख रुपये निधी आत्महत्याग्रस्त शेतक:यांच्या कुटुंबीयांना दिला जाईल, अशी घोषणा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली.

Convention funding to suicide victims: | संमेलनाचा निधी आत्महत्याग्रस्त शेतक:यांना

संमेलनाचा निधी आत्महत्याग्रस्त शेतक:यांना

धुळे : कोणाच्या भ्रष्टतेबद्दल मला कधीच आदर वाटणार नाही. कागदावर धरणे बांधून शेतक:यांना पाणी मिळणार नाही. शेतक:यांचे दु:खाचे अश्रू पुसण्यासाठी अखिल भारतीय साहित्य संमेलनात गोळा होणारा 50-60 लाख रुपये निधी आत्महत्याग्रस्त शेतक:यांच्या कुटुंबीयांना दिला जाईल, अशी घोषणा पिंपरी-चिंचवड येथे होणा:या 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली.

मराठी

 

श्रीपाल सबनीस यांची धुळे ही कर्मभूमी असल्यामुळे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहरातील शाहू नाटय़गृह येथे धुळेकरांच्या वतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी ते बोलत होते.

ही चूक मी करणार नाही..

सबनीस म्हणाले की, महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा विच्छिन्न झालेली आहे. याकडे डोळेझाकपणा करण्याचा बेशरमपणा मी करणार नाही. महाराष्ट्राची विस्कटलेली घडी बसविणे हे माङो कर्तव्य राहिल

खान्देश सुख-दु:खाचा साक्षीदार

खान्देशाचे आशीर्वाद असल्यामुळेच मी एवढय़ा मोठय़ा पदार्पयत पोहचू शकलो. धुळेकर जनता ही माङया सुख-दु:खांची साक्षीदार आहे. सगळ्या संघर्षातून विद्याथ्र्यानी मला वाचविले. पहिली भाकरी विद्यावर्धिनी कॉलेजने दिली. 11 कोटी जनतेचा मानबिंदू म्हणून सर्वाचे प्रतिनिधित्व करणार आहे. असेही सबनीस म्हणाले.

गाणे म्हणून शिक्षण..

माङया आयुष्यात वैचारिक मतभेद नेहमी होत गेले. त्यामुळे वडिलांचे व माङोही जास्त पटले नाही. वडील हैद्राबाद मुक्ती संग्रामातील सेनानी होते. घरची 100-150 एकर जमीन होती, परंतु वडिलांमध्येही जमीनदारांचे काही गुण-अवगुण होते. त्यामुळे घर सोडले. रस्त्यावर गाणे गाऊन शिक्षण घेतले, परंतु विचारांशी तडतोड कधी केली नाही.

साहित्यिकांनी एकत्र यावे.

मोदी विदेश दौ:यात आपल्या हिंदुत्ववादाचा कुठे उल्लेखही करत नाहीत. ते गौतम बुद्ध, गांधींच्या विचारांचा प्रसार करत आहेत. विकासाच्या मुद्यावर शरद पवार, गडकरी यांची मैत्री होऊ शकते तर डाव्या व उजव्या विचारश्रेणीच्या साहित्यिकांनी का एकत्र येऊ नये. प्रत्येक जातीत ब्राrाण्यवाद आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे.भारतीय प्रबोधन आणि आंबेडकरयात काही वाद नाही.

जळगाव कोर्टाचे वॉरंट..

एका पुस्तकात आंबेडकरी विचारांची बदनामी झाली म्हणून जळगावच्या एका रिक्षावाल्याने माङयाविरुद्ध कोर्टात याचिका दाखल केली. त्यामुळे सत्कार समारंभास येण्यास थोडा उशीर झाला. स्वत: आंबेडकरवाद्यांनी हे पुस्तक वाचले तर त्यांना कुठे अवमानना वाटली नाही.

खान्देशच्या मातीचे संस्कार.

खान्देशच्या मातीचे अन्न मी खाल्ले आहेत. या मातीचे संस्कार माङयावर आहेत. पंतप्रधान मोदींचा विरोधक किंवा समर्थक मी नाही. काँग्रेसचा नाकर्तेपणा व भ्रष्टाचार माजल्याने सत्तांतर झाले. प्रत्येकाने माणसाच्या प्रामाणिकपणावर भरोसा ठेवला पाहिजे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री हेमंत देशमुख होते. या वेळी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, आमदार डी.एस.अहिरे, पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, एम.जी. धिवरे, गोपाल केले, रमेश श्रीखंडे, माजी आमदार सदाशिव माळी, लखन भतवाल, जगदीश गायकवाड, विनोद मोरणकर, माजी आमदार शरद पाटील, माजी आमदार पी.डी.दलाल, जगदीश देवपूरकर, राजू भावसार, भूपेंद्र लहामगे तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

पा्रस्ताविक माजी आमदार शरद पाटील यांनी केले. सूत्रसंचालन जगदीश देवपूरकर यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमंत देशमुख म्हणाले की, सबनीस यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळणे म्हणजे धुळ्याच्या दृष्टीने खूप अभिमानाची गोष्ट आहे. साहित्य हे मनोरंजानासाठी नाही तर सर्वसामान्यांचे अश्रू पुसणारे असले पाहिजे. धर्मग्रंथ हे उत्तम साहित्याचे नमुने आहेत. लोकशाहीच्या मजबुतीसाठी साहित्यिकांनी योगदान द्यावे.

यांनी मांडले विचार..

या वेळी बाळू सोनवणे, पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील, दिलीप पाटील, एम.जी.धिवरे, माजी आमदार पी.डी.दलाल, डी.बी.जगत्पुरिया, अण्णासाहेब मिसाळ, डी.एस.अहिरे, दिलीप पाटील यांनी विचार मांडले.

 

Web Title: Convention funding to suicide victims:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.