प्रवाशांच्या सुविधेसाठी सर्व पॅसेंजर गाड्यांचे होणार ‘मेमू’त रूपांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:19 IST2021-08-26T04:19:34+5:302021-08-26T04:19:34+5:30
भुसावळ विभाग : पॅसेंजरप्रमाणेच असणार ‘मेमू’ एक्स्प्रेसचे तिकीट दर जळगाव : भुसावळ रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी पॅसेंजर गाड्यांच्या जागी ...

प्रवाशांच्या सुविधेसाठी सर्व पॅसेंजर गाड्यांचे होणार ‘मेमू’त रूपांतर
भुसावळ विभाग : पॅसेंजरप्रमाणेच असणार ‘मेमू’ एक्स्प्रेसचे तिकीट दर
जळगाव : भुसावळ रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी पॅसेंजर गाड्यांच्या जागी मेमू एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोरोनामुळे मेमू एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या नसल्या तरी अनलॉकनंतर लवकरच ही सेवा सुरू करण्याचा विचार रेल्वे करत आहे. तसेच मेमू एक्स्प्रेसच्या तिकीट दरात कुठलीही वाढ नसून, पॅसेंजरप्रमाणेच या गाड्यांचे तिकीट दर राहणार असल्याचे भुसावळ जनसंपर्क विभागातर्फे सांगण्यात आले.
भुसावळ विभागातून गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे, बडोदा या मार्गावर पॅसेंजर सेवा सुरू आहे. भुसावळ विभागातून निघाल्यानंतर वाटेतील प्रत्येक थांब्यांवर या गाड्या थांबत असल्यामुळे, शहरी भागासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य प्रवाशांना या गाड्यांचा प्रवास मोठ्या प्रमाणावर फायद्याचा ठरत आहे. विशेष म्हणजे एक्स्प्रेसपेक्षा पॅसेंजरचा तिकीट दर कमी असल्यामुळे प्रवासी पॅसेंजर गाड्यांनाच प्राधान्य देत आहेत. बाराही महिने गर्दी राहत असल्यामुळे, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी वेगवान, सुरक्षित व सुलभ आसन क्षमता असणाऱ्या मेमू एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे प्रत्सीशी संघटनांमधून स्वागत करण्यात येत असून, या गाड्यांचे तिकीट पॅसेंजरप्रमाणेच ठेवण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
इन्फो :
गाडी क्रमांक गाडी नाव सध्या सुरू की बंद
५११८१ देवळाली पॅसेंजर बंद
५११५४ मुंबई पॅसेंजर बंद
५९०२६ अमरावती पॅसेंजर बंद
५१२८५ नागपूर पॅसेंजर बंद
इन्फो :
...तरच प्रवाशांना मेमू एक्स्प्रेसचा प्रवास परवडणार :
भुसावळ रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातील सर्व पॅसेंजर गाड्यांचा मेमू एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र, मेमूचे भाडे हे पूर्वीच्या पॅसेंजरप्रमाणे राहायला हवे, तरच मेमू एक्स्प्रेसचा प्रवास प्रवाशांना परवडणार आहे. जर या गाडीचे तिकीट जास्त राहिले, तर प्रवाशांना परवडणार नाही.
नितीन सोनवणे, प्रवासी
पॅसेंजरच्या जागी मेमू एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत अनेक वर्षांपासून मागणी होती. आता रेल्वे प्रशासनाने पॅसेंजरच्या जागी मेमू एक्स्प्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, प्रवाशांची या गाडीला आणखी संख्या वाढेल. मात्र, पॅसेंजरप्रमाणेच या गाडीचा तिकीट दर असणे गरजेचे आहे, तरच प्रवाशांना हा प्रवास फायद्याचा ठरणार आहे.
संजय चौधरी, प्रवासी
इन्फो :
पॅसेंजरच्या उत्पन्न वाढीची कारणे :
- भुसावळ विभागातून धावणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्यांचे तिकीट हे एक्स्प्रेसपेक्षा निम्मे कमी असते. यामुळे प्रवाशांची पसंती पॅसेंजर गाड्यांना आहे.
- भुसावळ विभागातून धावणाऱ्या पॅसेंजर गाड्यांना प्रत्येक स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद असल्यामुळे, पॅसेंजर गाड्यांना उत्पन्न जास्त आहे.
- नोकरीनिमित्त शहरात येणारे चाकरमानी पॅसेंजर गाड्यांनीच प्रवास करत असल्यामुळे, या गाड्यांना बाराही महिने भरघोस उत्पन्न मिळत आहे.
इन्फो :
रेल्वे व्यवस्थापकांचा कोट (बाकी)