महिला स्वच्छतागृहांसंदर्भात स्थापन समितीची बैठक घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:20 IST2021-08-21T04:20:55+5:302021-08-21T04:20:55+5:30
जळगाव- शहरातील महिला स्वच्छतागृहांच्या मनपा प्रशासनाने स्थापन केलेल्या समितीची गेल्या ५ वर्षापासून एकही बैठक झालेली नाही. शहरात महिला स्वच्छतागृहांचा ...

महिला स्वच्छतागृहांसंदर्भात स्थापन समितीची बैठक घ्या
जळगाव- शहरातील महिला स्वच्छतागृहांच्या मनपा प्रशासनाने स्थापन केलेल्या समितीची गेल्या ५ वर्षापासून एकही बैठक झालेली नाही. शहरात महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून समितीची बैठक लवकरात लवकर घेण्यात यावी अशी मागणी निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी महापौर जयश्री महाजन यांच्याकडे केली आहे. मनपा प्रशासन आणि वेळोवेळी आलेल्या सत्ताधारी प्रतिनिधींकडे पाठपुरावा करून देखील तो विषय आजवर मार्गी लागलेला नाही. महिला स्वच्छतागृहांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश पारित केले आहेत. मनपाला याबाबत वारंवार कळवून देखील त्यांनी त्याचे पालन केलेले नसल्याचे म्हटले आहे.
मनपाकडून प्लास्टिक विक्री करणाऱ्यांविरोधात मोहीम
जळगाव - शहरात मोठ्या प्रमाणात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्लास्टिक मुक्त शहर अभियान राबविण्यात येत आहे. यात शहरातील व्यापारी व्यावसायीकांनी त्यांच्याकडील प्लास्टिकचा साठा मनपा अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे आरोग्य विभागाने आता सिंगल युज प्लास्टिकचा साठा , विक्री करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू करण्यात येणार असून, यात जप्ती व दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
मनपाकडून सोमवारपासून गाळेभाडे वसुली मोहीम
जळगाव : महापालिका प्रशासनाकडून मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडून थकीत भाड्याची वसुली मोहीम पुन्हा सोमवारपासून सुरु करण्यात येणार आहे. राज्य शासनाने गाळेधारकांवर मनपाने लावलेला पाच पट दंड रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मनपा प्रशासनाने थकीत भाड्यापोटी गाळेधारकांकडे थकीत रक्कमेतून पाच पट दंडाची रक्कम वजा केली आहे. आता नव्याने बिल घेवून ती बील मनपाकडून गाळेधारकांना देण्यात येणार आहेत.