लोकमतच्या रक्तदान शिबिरात पोलिसांचे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:11 IST2021-07-09T04:11:48+5:302021-07-09T04:11:48+5:30
जळगाव : लोकमत रक्ताचं नातं या महायज्ञाला सर्वच क्षेत्रातून प्रतिसाद मिळत आहे. या उक्रमाअंतर्गत गुरूवारी पोलीस मल्टीपर्पज हॉल येथे ...

लोकमतच्या रक्तदान शिबिरात पोलिसांचे योगदान
जळगाव : लोकमत रक्ताचं नातं या महायज्ञाला सर्वच क्षेत्रातून प्रतिसाद मिळत आहे. या उक्रमाअंतर्गत गुरूवारी पोलीस मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित रक्तदान शिबिरात २१ पोलिसांनी रक्तदान केले.
पोलीस मल्टीपपर्ज हॉल येथे झालेल्या रक्तदान शिबिरात जिल्हा रुग्णालयातील रक्तकेंद्राकडून रक्तसंकलन करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक (गृह) डी.एम.पाटील, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, उपनिरीक्षक चौधरी, जयंत चौधरी, लोकमतचे कार्यकारी संपादक रवी टाले, सहाय्यक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी, जिल्हा रुग्णालयातील रक्तकेंद्रांचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.उमेश कोल्हे, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी रोहिणी देवकर, भरत महाले, अनिल पाटील, जनसंपर्क अधिकारी नीलेश पवार, मोहम्मद इफ्तीयार, सुनील अनपढ, अरूण चौधरी आदी उपस्थित होते.
महिला पोलिसांनी बिनधास्त केले रक्तदान
पुरूषांच्या तुलनेत महिला रक्तदात्यांची संख्या कमी असते, असे चित्र समोर येत असताना महिलांनी हिमोग्लोबीनची पातळी ठिक असल्यास बिनधास्त रक्तदान करावे, असा सल्ला डॉक्टर देतात. महिलानीही या चळवळीत सहभाग घेतल्यास रक्ताचा तुटवडा भासणार नाही, असेही तज्ञांचे मत आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या रक्तदान शिबिरात महिला पोलिसांनी अधिक रक्तदान केले. महिलांनी न घाबरता रक्तदान करावे, असा संदेश या महिला पोलिसांनी यातून दिला आहे.