ठेकेदाराला अभय

By Admin | Updated: December 5, 2014 15:02 IST2014-12-05T15:02:57+5:302014-12-05T15:02:57+5:30

निकृष्ट शालेय पोषण आहाराचा पुरवठा करून हजारो चिमुकले, विद्यार्थी आदींच्या जिवाशी खेळ करणार्‍या सालासर ट्रेडींग कंपनी, पाळधी ता.धरणगाव यांना वाचविण्यासाठी आता राजकीय मंडळी पुढे आली आहे.

Contractor Abbey | ठेकेदाराला अभय

ठेकेदाराला अभय

जळगाव : निकृष्ट शालेय पोषण आहाराचा पुरवठा करून हजारो चिमुकले, विद्यार्थी आदींच्या जिवाशी खेळ करणार्‍या सालासर ट्रेडींग कंपनी, पाळधी ता.धरणगाव यांना वाचविण्यासाठी आता राजकीय मंडळी पुढे आली आहे. 

यामुळेच की काय? मागील ३0 तारखेला स्थानिक गुन्हे शाखेकडे शिक्षण विभागाने तक्रार करून संबंधितांवर गुन्हे दाखल झालेले नाहीत किंवा कारवाई झालेली नाही. राजकीय दबाव आल्याने हा प्रकार पोलिसांनी केला आहे. दुसर्‍या बाजूला प्रभारी शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर यांच्यानुसार तक्रार दिली आहे. पण अन्न व प्रशासन विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने सांगितले असून, हा अहवाल आल्यावर कारवाई होईल, असेही सांगण्यात आल्याचे गाडेकर म्हणाले. 
दबाव की आणखी काय?
शालेय पोषण आहार तपासणीत शहरातील विनोद राठी यांच्या स्वस्तिक गोदामात निकृष्ट आहार मिळाला होता. राठी हे सालासर कंपनीचे भागीदार आहे. पण या सालासर ट्रेडींग कंपनीसह राठी यांना काळ्य़ा यादीत टाकण्याचा साधा प्रस्तावही शिक्षण विभागाने तयार केलेला नाही. या दोघांना काळ्य़ा यादीत टाकण्याबाबत सीईओच निर्णय घेतील, असे म्हणत शिक्षण विभागाने टोलवाटोलवी सुरू केली आहे. 
पुढार्‍यांशी जवळीकता 
सालासर ट्रेडींग कंपनीशी संबंधित मंडळी सत्तेत असलेल्या एका पक्षाच्या पुढार्‍यांशी जवळीकता साधून आहे. याच सत्ताकारणामुळे दबाव येत आहे. पण जि.प.च्या शाळेत जाणार्‍या चिमुकल्यांच्या जिवाशी खेळण्याच्या प्रकारणावर पांघरून घालून दोषी सुटू शकत नाही, असे काही सामाजिक संस्थांनी म्हटले असून, याबाबत न्यायालयातून दाद मागण्याची तयारी या संस्थांनी केली आहे.
■ शालेय पोषण आहार पुरवठादार व जि.प.च्या सत्तेतील एक पक्ष यांच्यात निकटचे संबंध आहेत. यामुळेच की काय सत्ताधार्‍यांमधील एक पक्ष या प्रकरणी शांत आहे. कुठलीही कारवाई, तपासणीची मोहीम या पक्षाने हाती घेतलेली नाही. 
■ ठेकेदाराला काळ्य़ा यादीत टाकले जाऊ नये यासाठी एका आमदारानेदेखील प्रयत्न केले आहेत. यामुळे शिक्षण विभागातील खादाडांनादेखील फावले असून, ही मंडळी थंड आहे. 
 

Web Title: Contractor Abbey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.