शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील ३१ गावांमध्ये दुषित पाणी पुरवठा

By ajay.patil | Updated: April 9, 2023 18:06 IST

नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ६५ गावांमध्ये दुषित पाणी पुरवठा होत होता.

जळगाव - जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील १ हजार हून अधिक गावांच्या पाणी पुरवठ्याची तपासणी केली असता, त्यात जिल्ह्यातील ३१ गावांमध्ये दुषित पाणी पुरवठा होत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचा अहवाल पाणी नमुने तपासणी करणाऱ्या जिल्हा प्रयोगशाळेकडून देखील करण्यात आला आहे.

जि.प.कडून गेल्या महिन्यात हे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात ही माहिती समोर आली आहे. नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ६५ गावांमध्ये दुषित पाणी पुरवठा होत होता. आता त्यात घट होवून ती संख्या ६५ वरुन ३१ वर आली आहे. पावसाळ्यात मात्र दुषीत पाणी पुरवठा होण्याचे प्रकार वाढत असतात. दरम्यान, ज्या गावांमध्ये दुषित पाणी पुरवठा होत असल्याचे आढळून आले आहे. त्या गावांमध्ये जि.प.प्रशासनाने गावातील नादुरूस्त व्हाल्व दुरूस्त करणे, गावातील गळत्या रोखणे, ज्या भागातून जलवाहीनी गेली आहे त्या भागातील उकीरडे उचलण्याबाबत पत्र देण्यात आले आहे .तसेच जलकुंभामध्ये ॲलम, तुरटी टाकून पाणी शुध्द देण्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या गावांचा आहे समावेश..

जिल्ह्यातील ३१ गावांना सध्या अशुध्द पाणी पुरवठा होत असल्याचे आढळून आले आहे. त्यात सर्वाधिक ६ गावे रावेर तालुक्यातील आहे. यात कुंभारखेडा, बोरखेडासिम, कुसुंबा खु,कुसुंबा बु, कठोरा-धुरखेडा, कोळदा या गावांचा समावेश आहे. अमळनेर तालुक्यात खेडी खु,नंदगाव,पळासदळ,टाकरखेडा या गावांचा समावेश आहे. जळगाव तालुक्यातील  विटनेर, तांडा, वराड, सुभाषवाडी, भडगाव तालुक्यातील बांबरूड, बोदवड तालुक्यात करंजी,धानोरी,धोंडखेडा, चोपडा तालुक्यात मोहीदा , उजाड, कर्जाने , धरणगाव तालुक्यात रोटवद, कंडारी बु, एरंडोल तालुक्यात जानफळ), जामनेरमधील तिघ्रे, टाकळी, मुक्ताईनगर तालुक्यात कोठा, पाचोऱ्यातील खाजोळे, पारोळ्यातील होलसर, कामतवाडी तर यावल मधील कठोरा गावांचा समावेश आहे.

९२९ गावांमध्ये शुध्द पाणी

जिल्ह्यातील १  हजार १५५ गावांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ३१ गावांमध्ये पाणी पुरवठा होत असल्याचे निष्पण्ण झाले. दरम्यान, गेल्या पाच वर्षांपासून सलग ज्या गावात साथ आली नाही, अशा गावांना सील्वर कार्ड दिले जाते, त्यात जिल्ह्यातील ९२९ गावांचा समावेश आहे. या ९२९ गावांमध्ये शुध्द पाणी पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावWaterपाणी