ट्रान्सफार्मर वाहून नेणारा कंटेनर अजिंठा चौफुलीजवळ उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:12 IST2021-06-19T04:12:04+5:302021-06-19T04:12:04+5:30

जळगाव : ट्रान्सफार्मर वाहून नेणारा जैैन कंपनीचा कंटेनर शुक्रवारी दुपारी १२ वाजता अजिंठा चौफुलीजवळ अचानक उलटला. या अपघातात कुणीही ...

The container carrying the transformer overturned near Ajanta Chowfuli | ट्रान्सफार्मर वाहून नेणारा कंटेनर अजिंठा चौफुलीजवळ उलटला

ट्रान्सफार्मर वाहून नेणारा कंटेनर अजिंठा चौफुलीजवळ उलटला

जळगाव : ट्रान्सफार्मर वाहून नेणारा जैैन कंपनीचा कंटेनर शुक्रवारी दुपारी १२ वाजता अजिंठा चौफुलीजवळ अचानक उलटला. या अपघातात कुणीही जखमी झालेले नसले तरी कंटेनरखाली दबून चिनी मातीच्या भांड्यांचा चुराडा होऊन नुकसान झाले आहे.

एमआयडीसीतून ट्रान्सफार्मर लोड करून जैैन कंपनीचा कंटेनर (क्र.एमएच.१९.एस.३४८८) हा बांभोरीच्या दिशेने जात होता. अचानक दुपारी १२ वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुलीजवळ हा कंटेनर खोल साईडपट्टीमुळे उलटला. ज्याठिकाणी कंटेनर उलटला, त्याच्या अगदी नजीक माठ विक्रेत्याचे दुकान होते. सुदैवाने तेथे ग्राहक नसल्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही; मात्र तीस ते चाळीस हजार रुपये किमतीची चिनी-मातीची भांडी कंटेनर खाली दबून नुकसान झाले. अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून, याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. अपघातामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती़, तसेच कंटेनरच्या डिझेल टँकमधून डिझेलची मोठ्या प्रमाणात गळती होत होती. हा प्रकार कळताच, वाहतूक पोलीस कर्मचारी समा तडवी यांनी माठ विक्रेत्यांच्या मदतीने डिझेल गळती थांबविण्याचा प्रयत्न केला.

Web Title: The container carrying the transformer overturned near Ajanta Chowfuli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.