ग्राहक पंचायतीतर्फे कायदा अभ्यास वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 23:40 IST2019-09-19T23:40:00+5:302019-09-19T23:40:05+5:30

अमळनेर : तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे १५ सप्टेंबर रोजी येथील रोटरी हॉलमध्ये ग्राहक संरक्षण कायदा व त्यातील सुधारित ...

Consumer panchayat law study class | ग्राहक पंचायतीतर्फे कायदा अभ्यास वर्ग

ग्राहक पंचायतीतर्फे कायदा अभ्यास वर्ग



अमळनेर : तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे १५ सप्टेंबर रोजी येथील रोटरी हॉलमध्ये ग्राहक संरक्षण कायदा व त्यातील सुधारित कायद्यांविषयी अभ्यासवर्ग घेतला.
धुळे जिल्हा ग्राहक न्यायालयाचे न्यायाधीश संजय बोरवाल, ज्येष्ठ विधिज्ञ जितेंद्र निळे व दीपक जोशी प्रमुख पाहुणे होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तथा जिल्हा ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष विकास महाजन होते.
याप्रसंगी संजय बोरवाल, दीपक जोशी, विकास महाजन यांनी पूर्वीचा तसेच सुधारित ग्राहक संरक्षण कायदा २०१९ याविषयी मार्गदर्शन केले. भारती अग्रवाल, विजय शुक्ल, सुनील वाघ, महेश कोठावदे, ताहा बुकवाला, खदिर सादिक, मेहराज बोहरी, उर्मिर्ला अग्रवाल, अंजू ढवळे, ज्योती भावसार, हेमंत भांडारकर, अजयसिंग पाटील, जयंतीलाल वानखेडे, बापू चौधरी, सतीश देशमुख आदींनी प्रयत्न केले.

 

Web Title: Consumer panchayat law study class