जामनेर, जि.जळगाव : नागरिकांना कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी नगराध्यक्ष साधना महाजन, मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका स्वच्छतेचे वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. नागरिकांसाठी पालिकेसमोर सॅनिटायझर चेंबर उभारण्यात आला आहे.या सॅनीटायझर चेंबरमधून सॅनिटायझरचे तुषार अंगावर झेलत नागरिक पायी अथवा आपल्या दुचाकीसह स्वत:चे सॅनिटायझमरेशन करुन घेत आहे. तसेच पालिकेकडून शहरातील अराफत चौक, भुसावळ चौफुली, वाकी रोड व उपजिल्हा रुग्णालयासमोरील रस्त्यावर दोन दोन टाक्यांमधे सॅनिटायझर ठेवल्याने नागरिकांची सोय झाली. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सर्वच भागात फवारणी केली जात आहे.नागरिकांनी कोरोनाची काळजी घेऊन घरातच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. यासाठी मेनरोडवर लिखाण केले आहे. नगराध्यक्ष साधना महाजन, मुख्याधिकारी राहुल पाटील व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.
जामनेर पालिकेकडून सॅनिटायझर चेंबरची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 14:53 IST
नागरिकांसाठी पालिकेसमोर सॅनिटायझर चेंबर उभारण्यात आला आहे.
जामनेर पालिकेकडून सॅनिटायझर चेंबरची उभारणी
ठळक मुद्देपालिकेसमोर सॅनिटायझर चेंबरयाशिवाय शहरातील विविध भागातही उभारणी