शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम ठेकेदारास अडीच लाखात लुटले; डोळ्यात मिरचीची पूड फेकत पाठित केले चाकूने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2023 19:29 IST

दुचाकी व अडीच लाख रुपये हिसकावून तरुण पसार झाले.

 भगीरथ माळी 

धरणगाव (जळगाव) : जळगावहून अमळनेरकडे दुचाकीने जाणाऱ्या इसमास अडवून डोळ्यात मिरची पूड फेकत चाकूने तीन वार करण्यात आले. त्यांच्याकडील अडीच लाख रुपये लुटण्यात आले. ही थरारक घटना म्हसले ता. अमळनेरनजीक मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. बबलू उर्फ राजेंद्र रमेश सूर्यवंशी (३५, रा. ताडेपुरा, अमळनेर, हल्ली मु. मेहरूण, जळगाव) असे हल्ल्यातील जखमी इसमाचे नाव आहे. ते सेंट्रींग कामाची ठेकेदारी करतात.  

अमळनेर येथे जाण्यासाठी मंगळवारी दुपारी ते दुचाकीने निघाले होते.  त्याच्यासोबत प्लॉट व्यवहाराचे अडीच लाख रुपये होते. धरणगावपासून पाच किलोमीटर अंतरावर  म्हसले गावाजवळ अचानक आलेल्या दुचाकीवरील सहा जणांनी त्यांना अडवले आणि त्यांच्या डोळ्यात तिखट घालून त्याच्या पाठीत चाकूने तीन वार केले. तसेच त्यांच्याकडील दुचाकी व अडीच लाख रुपये हिसकावून तरुण पसार झाले.

युवकांची सतर्कताघटनेनंतर राजेंद्र हे जखमी अवस्थेत म्हसले गावाकडे निघाले. त्याचवेळी  धरणगाव येथील तीन तरुण दुचाकीने येत होते. त्यांनी जखमी  राजेंद्र  यांना पाहिले आणि धरणगाव पोलिसांशी संपर्क साधत घटनेची माहिती केली.  पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांनी घटनास्थळ गाठून जखमीस रुग्णालयात  रवाना केले. सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांनीही घटनास्थळी भेट दिली.

टॅग्स :JalgaonजळगावtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी