चोपडा येथील शिवसेना आमदार लता सोनवणे यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:46 IST2020-12-04T04:46:57+5:302020-12-04T04:46:57+5:30

जळगाव : चोपडा येथील शिवसेनेच्या आमदार लता सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र रद्द ठरविण्याचा नंदुरबार येथील जात पडताळणी समितीचा ...

Consolation to Shiv Sena MLA Lata Sonawane from Chopda | चोपडा येथील शिवसेना आमदार लता सोनवणे यांना दिलासा

चोपडा येथील शिवसेना आमदार लता सोनवणे यांना दिलासा

जळगाव : चोपडा येथील शिवसेनेच्या आमदार लता सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र रद्द ठरविण्याचा नंदुरबार येथील जात पडताळणी समितीचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द ठरविला आहे.

न्यायाधीश गंगापूरवाला आणि न्यायाधीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने ३ रोजी हा निर्णय दिला. लता सोनवणे ह्या चोपडा विधानसभा मतदारसंघातून अनुसूचित जमाती या प्रवर्गातून निवडून आल्या आहेत. माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी यांनी या निवडीला आव्हान देत सोनवणे यांचा जातीचा दाखला अवैध असल्याची तक्रार औरंगाबाद खंडपीठाकडे केली होती. यावर खंडपीठाने नंदुरबार येथील जात पडताळणी समितीकडे चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

नंदुरबार येथील जात पडताळणी समितीने सोनवणे यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरुद्ध सोनवणे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी झाली आणि जात पडताळणी समितीचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला.

Web Title: Consolation to Shiv Sena MLA Lata Sonawane from Chopda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.