शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पारोळा तालुक्यात रुग्ण संख्येत सातत्याने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 9:01 PM

१६२० जण बाधित : बरे होण्याचे प्रमाण ७६.७३ टक्के

रावसाहेब भोसले ।पारोळा : पारोळा शहरासह तालुक्यात कोरोनाच्या संसर्ग पहिल्या दोन ते अडीच महिने तालुक्याच्या वेशीवर थोपविण्यात यश आले होते. पारोळा तालुक्याला चौफेर कोरोना ग्रस्त तालुक्याने घेरले होते. पण पारोळा तालुक्यात २२ मे पर्यंत एकही रुग्ण आढळून आला नव्हता. एक शिक्षक की जो बाहेर अमळनेर येथे नातेवाइकांकडे गेला. आणि घात झाला पारोळा शहरात डी.डी. नगर येथून मग कोरोना संसर्गाला सुरुवात झाली.यानंतर ओतार गल्लीतून एका दुकान कामगारापासून सर्व शहरात हळूहळू कोरोनाने पाय पसरविण्यास सुरुवात केली. गेल्या सव्वातीन महिन्यात १ हजार ६२० एवढे कोरोना बाधित रुग्णांची संख्या असून केवळ आॅगस्ट या महिन्यात ८६२ रुग्ण आढळले आहेत.रुग्ण संख्या अशी वाढलीपारोळा तालुक्यात ८ सप्टेंबर पर्यंत १ हजार ६२० एकूण रुग्ण संख्या आहे. त्यात शहरात ६६१ व ग्रामीण भागात ९५४ रुग्ण कोरोना बाधित आहेत. एकूण ५ हजारांच्या वर लोकांचे स्वॅब घेण्यात आले. त्यात १६२० रुग्ण पॉझिटिव्ह आले. त्यापैकी १२४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर कोरोनामुळे ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. बरे होण्याचा दर ७६.७३ टक्के आहे. आज ही कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहरात ९७ कन्टेनमेंट झोन आहेत. त्यापैकी २३ शहरात व ७४ ग्रामीण भागात आहेत. पण हे सर्व कंटेन्मेंट झोन ही कागदावर दिसत आहेत.व्यावसायिकांपासून फैलावपारोळा शहरात भाजीपाला व दुकाने या पासून कोरोनाच्या सर्वात जास्त फैलाव झाला. कारण पारोळा सभोवतालच्या सर्व तालुक्यात बंद पाळला. तेव्हा पारोळा तालुक्यातील सर्व दुकाने, भाजीपाला विक्री सुरू होती. शेजारील तालुक्याचे अनेक बाधित रुग्ण तेव्हा संपर्कात आले. आणि शहरातील काही दुकानदार त्यावर काम करणारी कामगार पॉझिटिव्ह झाले. त्यात त्यांची कुटुंब ही पॉझिटिव्ह झाले. असा शासकीय यंत्रणेचा निष्कर्ष आहे.ज्या वेळी तालुक्यात कोरोनाच्या विस्फोटाला सुरुवात झाली. त्यावेळी सामाजिक अंतराचा फज्जा उडाला. दुकाने नियमित सुरू झाली संपर्क वाढला सुरक्षितता हवी तेवढी घेण्यात आली नाही. त्याचाही फटका मोठ्या प्रमाणात बसला.ग्रामीण भागात फैलावतालुक्यात शेवगे बु, बहादरपूर, शिरसोदे, म्हसवे, राजवड, करंजी, महाळपूर, वसंतनगर, तामसवाडी, भोंडणदिगर , चोरवड, चहुत्र, रत्नापिंप्री, कंकराज, उंदिरखेडे, टोळी, मोंढाळे या गावांना कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले.कर्मचारी मिळेनापारोळा कुटीर रुग्णालयात २ वैद्यकीय अधिकारी पदाच्या व १ एक्स रे तंत्रज्ञ अशा तीन जागा रिक्त आहेत. रुग्णाल्यात प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. योगेश साळुंखे हे रुग्णासाठी देवदूत म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या सोबतीला आयुष व १०८ वरील डॉक्टर मदतीला आहेत.अद्यापही गर्दी कायमशहरातील बाजारपेठेत लोकांची प्रचंड गर्दी पाहण्यास मिळत आहे. जणू कोरोना संपला आता काही भीती नाही.अशा समजुतीने लोक बिनधास्त वावरत असतात. दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. मास्क न लावणारेही भरपूर दिसतात. कोणालाच कोणाची भीती नाही असे चित्र पाहण्यास मिळत आहे. तालुक्यात कोरोनामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला आहे.