शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात काँग्रेसचे उद्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 20:54 IST

प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके यांची उपस्थिती

ठळक मुद्देप्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थितीआगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांतील व्यूहरचनेबाबत होणार चर्चाजिल्ह्यातील माजी आमदार, माजी जिल्हा परिषद सदस्य व निष्ठावंत कार्यकर्त्यांचा होणार सत्कार

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२३ - आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुधवार २४ रोजी सकाळी ९ वाजता गोदावरील अभियांत्रिकी महाविद्यालयात काँग्रेसतर्फे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंतराव पुरके, महिला प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ.विश्वजीत कदम, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष राजीव वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे प्रभारी विनायक देशमुख यांनी  पत्रकार परिषदेत दिली.गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देतांना देशमुख यांनी सांगितले की, आगामी काळात होणाºया निवडणुकांसाठी जिल्हानिहाय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर घेण्यात येत आहे. बुधवार २४ रोजी जळगावात शिबिर होणार आहे. याठिकाणी युवक काँग्रेसचेही शिबीर होणार आहे. तर धनाजी नाना महाविद्यालयात महिला काँग्रेसचे शिबिर होणार आहे.सकाळी ९ ते ११ यावेळेत प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हे विधानसभा क्षेत्रनिहाय आढावा घेणार आहेत. त्यानंतर शिबिराला सुरुवात होईल. पहिल्या सत्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ‘भारता समोरील आर्थिक आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन करतील. माजी मंत्री प्रा.वसंतराव पुरके हे ‘उपेक्षित घटकांबाबतची प्रतिक्षा’ या विषयावर मार्गदर्शन करतील. डॉ.स्मिता शहापूकर या ‘भारतीय लोकशाही समोरील आव्हाने’ याविषयावर तर अभिजीत सपकाळ हे सोशल मिडीयावर मार्गदर्शन करणार आहेत.दुपारच्या सत्रात महिला आणि युवक काँग्रेसचे शिबीरार्थी जिल्ह्याच्या शिबीरात सहभागी होणार आहे. तिसरे सत्र हे राजकीय विषयावर राहणार आहे. जिल्ह्यातील काँग्रेस संघटन व कामकाजाचा आढावा जिल्हा प्रभारी सादर करतील. त्यानंतर महिला प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस, युवकचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम, आमदार भाई जगताप, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मार्गदर्शन करतील. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या भाषणाने शिबिराचा समारोप होणार आहे.संध्याकाळी ६ ते ९ या दरम्यान अशोक चव्हाण हे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर महापालिका आणि अन्य विषयांबाबत जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाºयांसोबत ते बैठक घेतील. यावेळी पत्रकार परीषदेस सहप्रभारी प्रदेश सरचिटणीस डॉ.हेमलता पाटील, प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, प्रदेश सरचिटणीस माजी आमदार शिरीष चौधरी, प्रदेश सचिव डी.जी.पाटील, सरचिटणीस रामकिसन ओझा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणJalgaonजळगाव