पाचोऱ्यात काँग्रेसने केला शिवसेना आमदारांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST2021-06-02T04:14:19+5:302021-06-02T04:14:19+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आघाडीचे प्रमुख आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे काम करीत ...

Congress protests Shiv Sena MLAs in Pachora | पाचोऱ्यात काँग्रेसने केला शिवसेना आमदारांचा निषेध

पाचोऱ्यात काँग्रेसने केला शिवसेना आमदारांचा निषेध

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आघाडीचे प्रमुख आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे काम करीत आहेत. असे असताना पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे आमदार किशोर पाटील हे आघाडीचे प्रमुख आहेत. म्हणजेच पालक असून पत्रकार परिषदेत काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ बरखास्त झाल्यामुळे ऑगस्ट २०२० मध्ये पाचोरा विश्रामगृहात एक गोपनीय बैठक आमदार व राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी केली आणि यात त्यांनी दोघा पक्षांचे प्रशासक म्हणून कोणते पदाधिकारी घ्यायचे, हे ठरवले.

त्यानंतर यालाही शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी तिलांजली देत, स्वतःच्या पक्षाच्याच १८ पदाधिकारी यांची यादी दि. १४ ऑगस्ट २०२० रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना शिफारस केली. मात्र, तत्कालीन संचालक मंडळ उच्च न्यायालयात गेल्याने त्यांना स्थगिती मिळाली. म्हणून हा विषय ‘जैसे थे’ थांबला. मात्र, पुन्हा शासनाने संचालक मंडळ बरखास्त केले म्हणून दि. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी पुन्हा राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह पाच लोकांची यादी पाठवली.

यावेळी काँग्रेस हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असताना काँग्रेसला विश्वासात न घेता काँग्रेसला डावलण्याचा प्रकार केल्याने याचा आम्ही निषेध करतो, असे सोमवंशी यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष अमजद पठाण, जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, शिवराम पाटील, महिला आघाडीच्या शीला सूर्यवंशी, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुकाध्यक्ष कल्पेश येवले, आदी उपस्थित होते.

Web Title: Congress protests Shiv Sena MLAs in Pachora