काँग्रेस जिल्हाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:13 IST2021-06-24T04:13:25+5:302021-06-24T04:13:25+5:30
जळगाव : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या प्रक्रियेला काँग्रेसतर्फे सुरूवात करण्यात आली आहे. त्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवली जात आहे. ...

काँग्रेस जिल्हाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला सुरूवात
जळगाव : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या प्रक्रियेला काँग्रेसतर्फे सुरूवात करण्यात आली आहे. त्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रभारी एच.के पाटील यांच्या कार्यालयाकडून काँग्रेसच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली जात आहे.
बुधवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दौरा होता. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या राज्य समितीवर असलेल्या पदाधिकाऱ्यांचा फौजफाटा देखील होता. जिल्हास्तरावर काही पदे रिक्त आहेत. तर काही ठिकाणी मोठे बदल केले जाणार आहे. त्यासाठीच हा दौरा होता. काही दिवस आधी कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनीही जळगावला भेट दिली होती. त्यावेळी फक्त कार्याकर्त्यांशी चर्चा केली होती.
मंगळवार पासून प्रभारी असलेले एच.के. पाटील यांच्या कार्यालयातून जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना मोबाईलवर संदेश मिळाले आहेत. त्यावर आपल्याशी कोणत्या वेळेत चर्चा केली जाणार आहे. तसेच जिल्हाध्यक्ष व इतर पदांसाठी आपल्याला कोणती नावे योग्य वाटतात. याचीही विचारणा केली जाते. ही माहिती गोपनीय ठेवण्याचे आश्वासन देखील दिले जाते. जिल्ह्यातील ६० प्रमुख पदाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली जात आहे.