अमळनेरात काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:13 IST2021-06-27T04:13:00+5:302021-06-27T04:13:00+5:30
अमळनेर : येथील तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारनेच ओबीसी आरक्षण संपविल्याचा आरोप करत, भाजपच्या अघोषित आणीबाणीच्या निषेधार्थ ...

अमळनेरात काँग्रेसचे आंदोलन
अमळनेर : येथील तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारनेच ओबीसी आरक्षण संपविल्याचा आरोप करत, भाजपच्या अघोषित आणीबाणीच्या निषेधार्थ डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले.
कोणी भाजप सरकारविरुद्ध बोलले, तर त्यावर ईडी लावली जाते, सीबीआय चौकशी केली जाते. भारतीय जनतेचे पूर्ण व्यक्तिस्वातंत्र्य केंद्र सरकारने हिरावून घेतले आहे. देशात स्वतंत्र विचाराच्या किंवा भाजपविरुद्ध विचारवंतांच्या हत्या केल्या जात आहे, असा आरोप करत, या अघोषित आणीबाणीचा निषेध अमळनेर शहर व तालुका काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. या आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, शहराध्यक्ष मनोज पाटील, जयवंतराव आबा, किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.सुभाष पाटील, बी.के. सूर्यवंशी अलीम मुजावर, संदीप घोरपडे, मुन्ना शर्मा, संतोष पाटील, नरेंद्र संदाशिव, शेखा मिस्त्री, राजू भट, फयाज कुरेशी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.