शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

जळगावात खड्ड्यांचा प्रश्नावर कॉँग्रेस आक्रमक : मामा, क्या हुआ तेरा वादा ..झुठी कसम, झुठा वादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 5:25 PM

मनपा प्रशासनाची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा

जळगाव - शहरातील खड्ड्यांमुळे होणारा जनसामान्यांना त्रास व त्यामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात असताना झोपलेल्या मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा विरोधात बुधवारी कॉँग्रेस व राष्टÑवादीकडून मनपासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. तसेच मनपा प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी २०१४ च्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात खड्डेुमुक्त शहरासाठी दिलेल्या आश्वासनाबाबत देखील आठवण करून देत ‘मामा, क्या हुआ तेरा वादा, झुठी कसम, झुठा वादा’ अशा घोषणा देत मनपा परिसर दणाणून सोडला.कॉँग्रेसचे महानगरप्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेस भवनापासून मनपा प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या मंगला पाटील, योगेश देसले, स्वामी रेणापुरकर यांच्यासह कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी मनपा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. टॉवर चौक, इच्छापुर्ती गणेश मंदिर, गोलाणी मार्केटमार्गे ही अंत्ययात्रा काढून मनपाच्या प्रवेशव्दारासमोर समारोप करण्यात आला.मनपा प्रशासनावर ३०२ चा गुन्हा दाखल करामनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरातील रस्ते खड्डेमय झाले असून, हे खड्डे जीवघेणे ठरत आहेत. तसेच अनेकांचा खड्डयांमुळे जीव गेला असून, या मृत्यूंना मनपा प्रशासन जबाबदार असून त्यांच्यावर ३०२ कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी कॉँग्रेसकडून करण्यात आली. मनपा प्रशासन मुर्दाबाद, सत्ताधारी मुर्दाबादच्या जोरदार घोषणांनी मनपा परिसर दणाणून सोडण्यात आल्या.चिड येते ना खड्ड्यांची, लाज वाटतेय ना खड्ड्यांचीआमदार सुरेश भोळे यांनी २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी ‘ चिड येते ना खड्डयांची, लाज वाटतेय ना खड्ड्यांची’ या मथळ्याखाली शहरभर बॅनर लावले होते. याच बॅनरचा आधार घेत कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांनी आमदारांचीच घोषणा त्यांच्यावर उलटवत मनपासमोर जोरदार घोषणाबाजी केली. ‘या सत्ताधाºयांचे करायचे काय, खाली डोके वरती पाय’, ‘किती जणांचे बळी घेणार’ अशा घोषणांचे फलकदेखील यावेळी कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा हातात होते. शहरातील सर्वच रस्त्यांची दुरुस्ती आठ दिवसात न केल्यास मनपावर मोठा मोर्चा काढण्याचा इशारा डॉ.राधेश्याम चौधरी यांनी दिला.आयुक्तांना दिले निवेदनयावेळी मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांना निवेदन देण्यात आले. शहरातील प्रमुख रस्त्यांसह रहिवाशी भागातील रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावे, जेथे डांबरीकरण शक्य नाही तेथे रस्त्यांचे सपाटीकरण करून खडी कच टाकून खड्डे तातडीने दुरुस्त व्हावेत, शहरातील साफसफाई असमाधानकारक असून, सहा महिन्यांपासून धूळ खात पडलेल्या घंटागाड्या कार्यरत कराव्यात ,जेणेकरून स्वच्छता नीट होईल व शहरात अनेक भागात पथदिवे नादुरुस्त आहेत .ते तातडीने सुरु करावेत अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली.

टॅग्स :Jalgaonजळगाव