आरोग्य कार्यालयात गोंधळ

By Admin | Updated: October 3, 2015 00:25 IST2015-10-03T00:25:59+5:302015-10-03T00:25:59+5:30

नंदुरबार : आरोग्य अधिका:यांच्या दालनात गोंधळ घालून तोडफोड करणा:या डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Confusion in health office | आरोग्य कार्यालयात गोंधळ

आरोग्य कार्यालयात गोंधळ

नंदुरबार : आरोग्य अधिका:यांच्या दालनात गोंधळ घालून नेम प्लेटची तोडफोड करणा:या डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

एनआरएचएम योजनेंतर्गत काही वैद्यकीय अधिका:यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यासंदर्भात जाब विचारण्यासाठी गुरुवारी सायंकाळी डॉक्टर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात आले. त्यांनी डॉ.अजय विंचूरकर व डॉ.पगार यांच्याशी प्रशासकीय कारवाईसंदर्भात विचारणा करून वाद घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाद घालून डॉ.अजय विंचूरकर व डॉ.पगार यांच्या नावाची नेम प्लेट तोडून नुकसान केले. याबाबत दोघांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जाऊन तक्रार केली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत डॉ.अजय विंचूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉ.कोठारी, डॉ.जर्मनसिंग पाडवी, डॉ.सुंदर वळवी, डॉ.गणेश पवार, डॉ.मालती ठाकरे, डॉ.संजीत वळवी, डॉ.हरीश कोकणी, डॉ.विशाल चौधरी, डॉ.राजेश पाटील, डॉ.सुभाष बढे, डॉ.योगेश वळवी, डॉ.भानुदास गावीत, डॉ.मंगला ढाढर, डॉ.योसेफ गावीत, डॉ.घाटे, डॉ.भीमसिंग पाडवी, डॉ.सुहास पाटील यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार आनंदा पाटील करीत आहेत.

दरम्यान, या प्रकारामुळे जिल्हा परिषद वतरुळात खळबळ उडाली आहे. शनिवारी डॉक्टर काय पवित्रा घेतात याकडे लक्ष लागून आहे.

Web Title: Confusion in health office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.