शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी डान्स करायला लावलेल्या वसतिगृहात चौकशी समितीसमोरच गोंधळ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 06:12 IST

पाच मुलींना निरीक्षणगृहात हलविले. नियुक्त केलेल्या चौकशी समितीसह भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ, नगरसेविका सरिता नेरकर यांनीही बुधवारी सकाळी वसतिगृहात धाव घेऊन मुलींशी चर्चा केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : शासकीय आशादीप महिला वसतिगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. इकडे जळगावात जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीने बुधवारी वसतिगृहात धाव घेतली असता त्यांच्यासमोरच तक्रारदार मुलीने पत्रकारांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला बोलण्यापासून रोखण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला. 

जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल शासनाला रवानाही झाला असून त्यात घेतलेल्या जबाबात आक्षेपार्ह काही आढळले नसल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ‘लोकमत’ला दिली. तरीही सखोल चौकशी सुरू राहणार असल्याचे सांगितले. 

नियुक्त केलेल्या चौकशी समितीसह भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ, नगरसेविका सरिता नेरकर यांनीही बुधवारी सकाळी वसतिगृहात धाव घेऊन मुलींशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती गठीत केली आहे. या समितीने वसतिगृहाच्या अधीक्षक, परिविक्षाधीन महिला अधिकारी तसेच वसतिगृहातील महिला व मुलींची चौकशी केली. दरम्यान, ज्या मुलीने सामाजिक कार्यकर्त्यांकडे तक्रार केली, त्याच मुलीने तीन गरोदर मुलींना मारहाण केली. त्यामुळे या मुलींना तसेच अन्य दोन मुलींनीही मागणी केल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने निरीक्षणगृहात पाठविण्यात आले असून एका तक्रारदार मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. रहिवासी, वसतिगृहाचे कर्मचारी, तेथील मुली यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीतही तफावत आढळून आली.

रहिवासी म्हणतात, दोन वर्षांपासून त्रास वाढला‘लोकमत’ने वसतिगृहाच्या शेजारी राहणाऱ्या लोकांकडून माहिती घेतली असता, देवेंद्र मोरदे यांनी सांगितले की, दोन वर्षांपासून संस्थेत खूप वाईट प्रकार होत आहेत.  मंगळवारी दुपारी संस्थेत येऊन गोंधळ घालणाऱ्या पुरुष व महिलांविरुद्ध संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हापेठ पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे.

टॅग्स :Policeपोलिस