शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शोभायात्रेत भक्ती आणि संस्कृतीचा संगम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 12:10 IST

भगवान परशुराम जयंती

जळगाव : भगवान परशुराम जयंतीनिमित्त बहुभाषिक ब्राह्मण संघाच्यावतीने मंगळवारी संध्याकाळी आकर्षक शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेतून परंपरा, भक्ती आणि संस्कृतीचे दर्शन घडले. परशुरामांची भव्य प्रतिमा, बाजीराव पेशवा व राणी लक्ष्मीबाई ढोल पथक, महिलांचे लेझीम पथक, विविध देखावे हे या शोभायात्रेचे आकर्षण ठरले.बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीने ही शोभायात्रा काढण्यात आली. यंदा ढोल पथकांमध्ये प्रत्येकी ७५ ढोल व १५ ताशे होते. यात अनेक तालींचे सादरीकरण शोभायात्रेत करण्यात आले़ रणरागिणी लेझीम पथकाने तलवार, लाठ्या-काठ्या, दांडपट्टे आदींचे चित्तथरारक े प्रात्यक्षिके सादर केली.शोभायात्रेत समाजातील अनेक महापुरूष व संतांची वेषभूषा साकारलेले चित्ररथ सहभागी झाले होते. सहभागी समाजबांधवांसाठी ठिकठिकाणी थंड पेय, सरबताची व जागोजागी थंड पाण्याची व्यवस्था केली होती.शोभायात्रेत भगवान परशुरामासाठी स्वंयचलित रथ तयार करण्यात आला होता. रथावरील भगवान परशुराम मूर्ती शोभायात्राचे आकर्षणाचा विषय ठरला होता. शोभायात्रेत सर्वप्रथम ध्वजाचा अश्व विजयी थाटात चालत होता.नंतर विविध बॅनर लक्ष वेधून घेत होते. त्यानंतर झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि बाजीराव पेशवे यांच्या वेशभूशातील युवक युवती घोड्यावर स्वार होते. यासह लहान बालकांसाठी विशेष रेल्वे सजविण्यात आली होती़रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास दाणाबाजारातील अन्नदाता हनुमान मंदिर येथे माजी आमदार सुरेशदादा जैन, आमदार सुरेश भोळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, नगरसेवक विशाल त्रिपाठी, मंडळाधिकारी मिलिंद बुवा आदींच्या उपस्थितीत आरती करण्यात आली़ या ठिकाणी बुंदीचा प्रसाद वाटप करण्यात आला़ दरम्यान, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी रथचौकात शोभायात्रेला भेट दिली.ब्रह्मश्री परिवारातर्फे पूजनयशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड, अध्यक्ष संजय व्यास, लेखराज उपाध्याय, सुरेंद्रनाथ मिश्रा, विश्वनाथ जोशी, शिव शर्मा, अशोक वाघ, मोहन तिवारी, संजय कुळकर्णी, राजेश नाईक, सौरभ चौबे, पियुष रावळ, किसन अबोटी, गोपाळ पंडित, महेंद्र पुरोहित, पंकज पवनीकर, अजित नांदेडकर, केदार जोशी, निलेश राव, विशाल शर्मा, प्रकाश शर्मा, राधेश्याम व्यास, शेखर कुलकर्णी, गोविंद ओझा, श्याम दायमा, श्याम नागला, महेश दायमा, किरण दायमा, अजय डोहोळे, दिलीप सिखवाल, राजेंद्र कुलकर्णी, सुरेश शर्मा, महावीर पंचारिया, आनंद तिवारी, नंदकिशोर उपाध्याय आदी उपस्थित होते.ब्रह्मश्री बहुद्देशीय संस्थेतर्फे एसएमआयटी कॉलेजजवळील हनुमान मंदिरात परशुराम पूजन कार्यक्रम झाला़ मंगल सोनवणे, नगरसेविका प्रतिभा देशमुख, माजी नगरसेविका दीपाली पाटील, देवदत्त महाराज मोरदे, रेखा कुळकर्णी आदींची उपस्थिती होती़१५०० ग्लास मठ्ठामहर्षी गौतम गुर्जरगोड ब्राह्मण समाज मंडळार्फे शोभायात्रेत सहभागी नागरिकांना मठ्ठा वाटप करण्यात आला़ सुमारे पंधराशे ग्लास मठ्ठा वाटपाचे नियोजन होते़ स्वच्छतेच्या दृष्टीने ग्लास टाकण्यासाठी शेजारी टाकी ठेवण्यात आली होती़ प्रकाश व्यास, पुरूषोत्तम जोशी, दिलीप व्यास, चेतन शर्मा, नितीन शर्मा, अजय उपाध्याय यांनी हा मठ्ठा वाटप केला़महाबळ चौकात शोभायात्रेने वेधले लक्षभव्य शोभायात्रा, महापूजन, यासह विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भगवान परशुराम जन्मोत्सव मंगळवारी शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला़ महाबळ चौक येथून काढण्यात आलेल्या शोभायात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधले होते़ या आधी सकाळी ९ वाजेच्या सुमारास महाबळ चौक येथे भगवान परशुरामांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली़ ढोल ताशांचा गजर, फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या जल्लोषात हा जन्मोत्सव साजरा करण्यात आला़जळगाव जिल्हा भगवान परशुराम सेवा संघ, ब्राह्मण सेवा संस्था, ब्रह्मश्री बहुउद्देशीय संस्था, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, बी़ बी़ एऩ आणि अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी प्रतिमा पूजन व दुपारी शोभायात्रा काढण्यात आली़महाबळ चौकात विश्वासराव कुळकर्णी, अनिल अभ्यंकर, डॉ़ सूर्यवंशी, निलेश कुळकर्णी, भूपेश कुळकर्णी, नितीन कुळकर्णी, दीपक साखरे, प्रशांत महाशब्दे, रमाकांत वैद्य, विजय पाठक, रेखा कुळकर्णी, विद्या धर्माधिकारी, ममता जोशी, अविनाश जोशी यांच्याहस्ते पूजन करण्यात आले़ परिसरातील लोकप्रतिनिधी सुरेखा तायडे, जितेंद्र मराठे, अंजनाबाई सोनवणे, ज्योती चव्हाण, नितिन बरडे यांनी भेट दिली. सूत्रसंचालन भूषण मुळे यांनी केले़मान्यवरांच्या भेटीमहापौर सीमा भोळे, आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, महसूल उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी भेट दिली.सांगतेच्या वेळी ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष अ‍ॅड़ सुशिल अत्रे हे अध्यक्षस्थानी होते़ बहुभाषीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष निलेश कुळकर्णी यांनी प्रस्तावना केली़ सूत्रसंचालन पल्लवी कुळकर्णी यांनी केले़ यावेळी दादामहाराज जोशी, मंगेश महाराज जोशी, वे.शा.सं.अशोक साखरे, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र जोशी, ब्रह्मश्री बहुद्देशीय संस्थेचे संरक्षक दिनकर जेऊरकर यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Jalgaonजळगाव