१२ प्रकल्पांत ठणठणाट

By Admin | Updated: June 9, 2014 14:17 IST2014-06-09T14:17:58+5:302014-06-09T14:17:58+5:30

नंदुरबार जिल्ह्यातील १२ लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे झाले आहेत. तथापि, इतरही प्रकल्पांनी तळ गाठला आहे. आता जिल्हावासीयांना पावसाची प्रतीक्षा लागून आहे.

Conflict in 12 projects | १२ प्रकल्पांत ठणठणाट

१२ प्रकल्पांत ठणठणाट

नंदुरबार :नंदुरबार जिल्ह्यातील १२ लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे झाले आहेत. तथापि, इतरही प्रकल्पांनी तळ गाठला आहे. आता जिल्हावासीयांना पावसाची प्रतीक्षा लागून आहे.
नवापूर तालुक्यातील लघु तलाव हळदाणी २६ टक्के, खडकी पाच टक्के, खेकडा ४४ टक्के, खोकसा एक टक्के, मेंदीपाडा आठ टक्के, मुगधन १७टक्के, नावली ११ टक्के, रायंगण आठ टक्के, सोनखडकी पाच टक्के, सुलीपाडा सहा टक्के, विसरवाडी ४६ टक्के व नंदुरबार तालुक्यातील आंबेबारा १७टक्के, खोलघर १७टक्के, शनिमांडळ एक टक्के, सिरवाडे ३२ टक्के, ठाणेपाडा दोन २७टक्के, वासदरा आठ टक्के, वसलाय २२ टक्के, वावद २१ टक्के.शहादा तालुक्यातील दूधखेडा १३ टक्के, खापरखेडा सहा टक्के, कोंढावळ चार टक्के, शहाणे एक तर अक्कलकुवा तालुक्यातील खडकूना नऊ टक्के. तळोदा तालुक्यातील महुपाडा प्रकल्पात २0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. 
नवापूर तालुक्यातील मध्यम रंगावली १0.९३ टक्के, शहादा तालुक्यातील शहादा बॅरेज प्रकाशा ५३ टक्के, मध्यम प्रकल्प दरा ७८ टक्के, मध्यम प्रकल्प शिवण ५२ टक्के, असा एकूण मध्यम प्रकल्पांमधील ५६.३३ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. दरम्यान, आता पाऊस केव्हा लवकर पडतो याची शेतकर्‍यांसह संपूर्ण जिल्हावासीयांना प्रतीक्षा लागलेली आहे.

 ■ पावला, धनीबारा, कोकणीपाडा, ठाणेपाडा एक, लंगडी भवानी, लोंढरे, राणीपूर, पाडळपूर, गढावली, रोझवा, सिंगसपूर तसेच धडगाव तालुक्यातील उमराणी हे प्रकल्प पूर्णपणे कोरडेठाक झाले आहेत. 

Web Title: Conflict in 12 projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.