सुरेशदादांसह तिघांना सशर्त रजा

By Admin | Updated: November 8, 2015 00:14 IST2015-11-08T00:14:10+5:302015-11-08T00:14:10+5:30

धुळे : न्यायालयाने सुरेशदादा जैन, राजा मयूर आणि जगन्नाथ वाणी यांचा 12 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी पूजनासाठी रजेचा अर्ज सशर्त मंजूर केला आहे.

Conditional leave to all three, including Sureshdad | सुरेशदादांसह तिघांना सशर्त रजा

सुरेशदादांसह तिघांना सशर्त रजा

धुळे : जळगाव घरकूल प्रकरणाचे कामकाज मूळ फिर्यादी डॉ.प्रवीण गेडाम यांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. दरम्यान, न्यायालयाने सुरेशदादा जैन, राजा मयूर आणि जगन्नाथ वाणी यांचा 12 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी पूजनासाठी रजेचा अर्ज सशर्त मंजूर केला आहे.

या खटल्याचे कामकाज येत्या 17 व 18 नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे.

सुरेशदादा जैन व जगन्नाथ वाणी यांनी 12 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी पूजनासाठी जळगावला जाण्यास परवानगी मागितली होती. न्यायाधीशांनी जळगावऐवजी धुळ्यातच राहण्यास मुभा दिली. तर राजा मयूर यांचीही 9 ते 12 नोव्हेंबर यादरम्यान रजा मंजूर झाली आहे.

रजेच्या काळात तिघांनी सकाळी 8 वाजता पोलीस एस्कॉर्टसह कारागृहातून बाहेर पडल्यानंतर रात्री 8.30 वाजता पुन्हा त्यांना कारागृहात परतावे, अशी अट न्यायालयाने घातली आहे.

विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.आर. कदम यांच्या न्यायालयात घरकूल प्रकरणाचे कामकाज सुरू आहे. त्यात प्रकरणाचे मूळ फिर्यादी तथा नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांची साक्ष सरकार पक्षाकडून नोंदवली जात आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता सुनावणीची तारीख होती. मात्र, प्रवीण गेडाम यांची मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत महत्त्वाची बैठक असल्याने ते न्यायालयीन कामकाजासाठी उपस्थित राहू शकले नाहीत.

 

सरकार पक्षाचे म्हणणे घेतले

गेडाम हे सुनावणीच्या तारखेला का हजर नाहीत? याची विचारणा करत न्यायाधीशांनी सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण यांच्याकडून तोंडी म्हणणे नोंदवून घेतले.

यानंतर पुढे कामकाजासाठी उपस्थिती व अनुपस्थितीची माहिती न्यायालयाला कळवावी, अन्यथा त्याची रोजनाम्यात नोंद करण्यात येईल, असेही न्यायाधीशांनी स्पष्ट केले.

Web Title: Conditional leave to all three, including Sureshdad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.