बंडखोरी केलेल्या मतदार संघांमध्ये अटीतटीचे अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 12:41 PM2019-10-23T12:41:47+5:302019-10-23T12:42:18+5:30

११पैकी सात ठिकाणी उमेदवारी मिळाली असताना भाजप पदाधिकाऱ्यांच्या बंडखोरीने वाढविला सेनेचा संताप

Conditional estimates in revolted constituencies | बंडखोरी केलेल्या मतदार संघांमध्ये अटीतटीचे अंदाज

बंडखोरी केलेल्या मतदार संघांमध्ये अटीतटीचे अंदाज

Next

जळगाव : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असून आता प्रतीक्षा आहे ती निकालाची. जिल्ह्यात सत्ताधारी भाजपच्या उमेदवारीचा विचार केला तर यंदा भाजपच्या वाटेला सात जागा आल्या खºया मात्र युती असतानाही शिवसेनेचा उमेदवार असलेल्या जिल्ह्यातील चारही मतदार संघात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांचा संताप वाढविला. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी बंडखोरी झाली आहे, त्या मतदारसंघात अटीतटीचे अंदाज वर्तविले जात आहे. सध्या जिल्ह्यातील ११ पैकी सहा जागा भाजपच्या ताब्यात असल्या तरी या निकालात आपले वर्चस्व भाजप कायम राखते की शिवसेना मुसंडी मारते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२०१४च्या विधानसभा निवडणुकीवेळी युती नसल्याने भाजप व शिवसेना हे स्वतंत्रपणे लढले होते. त्या वेळी भाजपने सर्व ११ जागी उमेदवारी दिली होती. त्यात सहा मतदार संघात त्यांना विजय मिळविता आला. या विजयी उमेदवारांमधील जामनेर मतदार संघातून गिरीश महाजन, जळगाव शहर मतदार संघातून आमदार सुरेश भोळे, भुसावळमध्ये संजय सावकारे, रावेरमध्ये हरिभाऊ जावळे यांना या वेळी उमेदवारी मिळाली. मात्र उन्मेष पाटील यांची खासदारकीपदी वर्णी लागली तेथे मंगेश चव्हाण तर मुक्ताईनगरातून विजयी एकनाथराव खडसे यांना उमेदवारीच नाकारण्यात येऊन त्यांची कन्या अ‍ॅड. रोहीणी खडसे-खेवलकर यांना व अमळनेरातून गेल्या वेळी अपक्ष निवडणूक लढवित विजय मिळविणारे आमदार शिरीष चौधरी यांनी संधी मिळाली.
या सात जागा भाजपच्या वाटेला आल्यानंतरही शिवसेनेची उमेदवारी असलेल्या चार मतदार संघात भाजपच्या पदाधिकाºयांनी बंडखोरी केली. यामध्ये जळगाव ग्रामीण मतदार संघातून चंद्रशेखर अत्तरदे, चोपडा येथे प्रभाकर सोनवणे, एरंडोलला गोविंद शिरोळे, पाचोºयात अमित शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेचे नाराजी व्यक्त केली. या विषयावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतच जळगाव ग्रामीणचे शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी प्रचंड संताप व्यक्त केला होता. त्यानंतर मतदानाच्या दिवशीदेखील त्यांनी भाजपकडून केवळ २० टक्केच सहकार्य मिळाल्याचे सांगत उघड-उघड नाराजी व्यक्त केली.
बंडखोरी झालेल्या मतदार संघात वेगवेगळ््या सर्व्हेनुसार अटीतटीच्या लढतीचे अंदाज वर्तविले जात आहे. त्यात जळगाव ग्रामीण मतदार संघात शिवसेनेच उमेदवार गुलाबराव पाटील यांना प्रतिस्पर्धीपेक्षा झालेल्या एकूण मतदानापैकी केवळ दोन टक्के मते जास्त असल्याचा अंदाज सांगितला जात आहे. अशाच प्रकारे चोपडा मतदार संघात लता सोनवणे यांना एक टक्केच मते जास्त असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
शिवसेनेचीही भाजपच्या मतदारसंघात बंडखोरी
मुक्ताईनगर मतदारसंघातही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनीच बंडखोरी केल्यामुळे येथेही माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. या ठिकाणीही चंद्रकांत पाटील यांना मिळणाºया मतांमध्ये व भाजपच्या उमेदवार अ‍ॅड. रोहीणी खडसे यांच्या मतांमध्ये केवळ पाच टक्क्यांचा फरक वर्तविला जात आहे.
एकूणच २०१४मध्ये ११ जागा लढवून सहा ठिकाणी विजय मिळणाºया भाजपने या वेळी सात जागा व चार ठिकाणी केलेली बंडखोरी यामुळे एक प्रकारे सर्व ११ ठिकाणी भाजपने निवडणूक लढविली. त्यामुळे आता किती जागांवर भाजप विजय मिळविते, या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Conditional estimates in revolted constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव