तापी व्हॅलीच्या तीन दिवसीय गणेशोत्सवाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:21 IST2021-09-15T04:21:01+5:302021-09-15T04:21:01+5:30
भुसावळ : येथील रोटरी क्लब ऑफ भुसावळ तापी व्हॅली तसेच आर्या फाउंडेशन संचलित अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज, नेत्रम यांच्यातर्फे ...

तापी व्हॅलीच्या तीन दिवसीय गणेशोत्सवाची सांगता
भुसावळ : येथील रोटरी क्लब ऑफ भुसावळ तापी व्हॅली तसेच आर्या फाउंडेशन संचलित अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज, नेत्रम यांच्यातर्फे आयोजित तीन दिवसीय गणेशोत्सवाची उत्साहात सांगता झाली.
आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष उमेंंद्र वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम पार पडला. प्रथम दिवशी रोटरी क्लब ऑफ भुसावळ तापी व्हॅलीचे प्रेसिडेंट संजू भटकर व इनरव्हॅलीच्या प्रा. रश्मी शर्मा, मीना नेरकर यांच्या हस्ते गणेश मूर्तीची स्थापना झाली. नंतर विद्यार्थ्यांसाठी पोस्टर मेकिंग स्पर्धा घेण्यात आली. द्वितीय दिवशी पूजा थाली व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. त्यात द्वितीय दिवशी पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.कीर्ती फलटणकर व संगीता बोलके यांची प्रमुख उपस्थिती होती.
नेत्रम हॉस्पिटलचे डॉ. सुनील मेश्राम यांनी दुपारी मोफत नेत्र तपासणी केली. याचा ७५ रुग्णांनी फायदा घेतला. तृतीय दिवशी व्यासपीठावर रोटरीचे राजू शर्मा अध्यक्षस्थानी होते. सरकारी अभियोक्ता ॲड. नितीन खरे तसेच रोटरी क्लब तापी व्हॅलीचे सेक्रेटरी जीवन महाजन, हिरकणी महिला मंच उपाध्यक्ष अंजुमखान, माजी प्रेसिडेंट रोटरी तापी व्हॅली सुधाकर सनांसे, व्हॅलीच्या प्रोजेक्ट सेक्रेटरी मनीषा पाटील उपस्थित होत्या.
कार्यक्रमात पोस्टर मेकिंग स्पर्धांच्या प्रथम विजेत्या विद्यार्थिनी रेखा कोलते, द्वितीय विजेत्या विद्यार्थिनी पौर्णिमा पाटील आणि हर्षली राजपूत यांना बक्षीस देण्यात आले. रांगोळी स्पर्धेत प्रथम विजेती जान्हवी घाडगे आणि द्वितीय पुरस्कार भाग्यश्री महाले यांना देण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ बक्षीस विद्यार्थिनी जया बोराडे हिला देण्यात आले. प्रास्ताविक अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या प्राचार्या मनीषा बाविस्कर यांनी, सूत्रसंचालन प्रा. संध्या भोळे यांनी व जीवन महाजन यांनी, तर आभार प्रदर्शन आर्या फाउंडेशनच्या संचालिका डॉ. वंदना वाकचौरे यांनी केले.
यशस्वीतेसाठी पौर्णिमा पाटील, प्रजापती तायडे, ऐश्वर्या सुरवाडे, रेखा कोलते, सारिका बढे, हर्षाली राजपूत, सायली साबळे, अश्विनी निकम, शाहिद खाटिक, प्रफुल्ल भट, जया बोराडे, सुनीता बागुल व संपूर्ण विद्यार्थी ग्रुप, हिरकणी महिला मंच सदस्य नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राचा स्टाफ व रोटरी परिवार यांनी परिश्रम घेतले.