मुक्ताईनगर येथे डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाने चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 22:48 IST2020-10-13T22:48:27+5:302020-10-13T22:48:36+5:30
उपाययोजना करा : शिवसनेनेची निवेदनाद्वारे मागणी

मुक्ताईनगर येथे डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाने चिंता
मुक्ताईनगर : शहरामध्ये डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव पाहता लोक चिंताग्रस्त झाले आहे. याची दखल घेत तातडीने उपाय योजना राबविण्यात याव्या. यासाठी शहरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली. याबाबतचे निवेदन नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांना मंगळवारी देण्यात आले.
निवेदन देताना तालूका प्रमुख छोटू भोई, अल्पसंख्याक सेनेचे जिल्हा संघटक अफसर खान, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, शहर प्रमुख गणेश टोंगे, राजेंद्र हिवराळे, शहर संघटक वसंत भलभले , नगरसेवक संतोष मराठे , विभाग प्रमुख महेंद्र मोंढाळे, माजी उपसरपंच जाफर अली, शकुर जमादार, राजेंद्र तळेले, माजी युवा सेना तालुका प्रमुख सचिन पाटील, रविंद्र दांडगे , गणेश पालवे, कैलास बावणे, शाबीर शेख , प्रसिद्धी प्रमुख पप्पू मराठे यांच्यासह शिव सैनिकांची व नागिरकांची उपस्थिती होती.