कोरोनाच्या काळात आल्या ग्राहक मंचात तक्रारी कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:29 IST2021-03-04T04:29:43+5:302021-03-04T04:29:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या वर्षभरात कोरोनाच्या काळात ग्राहकांच्या तक्रारींची संख्यादेखील कमी झाली आहे. २०१९ मध्ये ...

कोरोनाच्या काळात आल्या ग्राहक मंचात तक्रारी कमी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या वर्षभरात कोरोनाच्या काळात ग्राहकांच्या तक्रारींची
संख्यादेखील कमी झाली आहे. २०१९ मध्ये जिल्ह्यातील ५४५ ग्राहकांनी
आपल्या तक्रारी दाखल केल्या होत्या. तर २०२० मध्ये वर्षभरात ४११
ग्राहकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. एप्रिल आणि मे २०२० या दोन
महिन्यांत लॉकडाऊन असल्याने एकही तक्रार दाखल झालेली नाही.
कोरोनाकाळात दोन महिने कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात आला होता. त्यामुळे
कुणीही घराच्या बाहेर निघाले नाही. त्यामुळे ग्राहक मंचात एकही तक्रार
दाखल करण्यात आली नव्हती. जूनमध्ये पुन्हा एकदा तक्रारींना सुरुवात झाली आहे.
जून महिन्यात १० तक्रारी दाखल झाल्या होत्या. तर सर्वाधिक तक्रारी
डिसेंबर महिन्यात ६९ जणांनी आपल्या तक्रारी केल्या होत्या. नोेव्हेंबर
महिन्यातदेखील तब्बल ५७ जणांनी तक्रार दिली होती. त्यासोबतच काही
तक्रारी या प्रलंबित आहेत.
नेमक्या काय आहेत तक्रारी
गेल्या वर्षभरात बहुतांश ग्राहकांचे ऑनलाईन शॉपिंग बंद होते. त्यामुळे
ऑनलाईन फसवणुकीच्या तक्रारी फारशा आलेल्या नाहीत. त्याऐवजी इतर तक्रारी
यंदा समोर आल्या आहेत. एका पालकाने आपल्या मुलाच्या शाळेच्या फी
संदर्भातील वाद ग्राहक मंचात नेला होता. त्याचा निवाडा जिल्हा पातळीवर
करण्यात आला होता.
तक्रारी कशा स्वरूपाच्या होत्या ?
आलेल्या तक्रारींपैकी बहुतांश तक्रारी या पतसंस्थांच्या ग्राहकांनी
केलेल्या तक्रारी आहेत. त्यासोबतच इतर ग्राहकांनी मॅन्युफॅक्चरींग
डिफेक्ट, मागविलेल्या वस्तूच्याऐवजी दुसरी वस्तू मिळणे यासारख्या
तक्रारींचा समावेश आहे. तसेच एक तक्रार मुलाच्या फीसंदर्भात पालकांनी
शाळेेविरोधात केलेली होती.
कोट - सध्या लॉकडाऊनमुळे कामकाजाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. बऱ्याचदा
पीठासीन अधिकारी त्या जागाच बहुतेकवेळा रिक्त असतात. त्यामुळे न्याय लवकर
मिळत नाही. कायद्यात सांगितल्याप्रमाणे न्याय मुदतीत मिळत नाही. - प्र. ह.
दलाल, जिल्हा संघटक, महाराष्ट्र ग्राहक पंचायत, जळगाव जिल्हा.
२०१९ मधील तक्रारी ५४५
२०२० मधील तक्रारी
जानेवारी ४९
फेब्रुवारी ५७
मार्च ३६
एप्रिल ०
मे ०
जून १०
जुलै ३७
ऑगस्ट ३७
सप्टेंबर २६
ऑक्टोबर ३७
नोव्हेंबर ५२
डिसेंबर ६९