शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

प्रवेश रद्द करत तक्रारदार परतला परभणीला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 12:11 IST

रॅगिंंग प्रकरण : डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले

जळगाव : सिनियर विद्यार्थ्यांकडून शनिवारी मध्यरात्री झालेल्या रॅगिंगच्या प्रकारानंतर तक्रारदार विद्यार्थी मुदस्सर मुख्तार इनामदार (वय-१९, रा़परभणी) याने सोमवारी इकरा युनानी महाविद्यालयातून प्रवेश रद्द करित मुळगावी परभणी येथे परतला़ दरम्यान, याप्रकरणाची महाविद्यालय प्रशासनाकडून चौकशी करण्यात येत असून सात दिवसांच्या आत पोलिसांना चौकशी अहवाल सादर करण्यात येणार आहे.काय घडले शनिवारी मध्यरात्रीपरभणी येथील मुदस्सर इनामदार याला शासकीय कोट्यातून जळगाव-शिरसोली रस्त्यावरील इकरा युनानी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता़ शुक्रवारी प्रवेश घेतल्यानंतर शनिवारी त्याच्या बॅचचा पहिलाच दिवस होता़ रात्री सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या वसतिगृहात आपापल्या खोल्यांमध्ये गेले होते. यावेळी १५ ते २० सिनीयर्स विद्यार्थ्यांनी शनिवारी मध्यरात्री नव्याने दाखल मुदस्सर याच्यासह काही विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या एका हॉलमध्ये नेऊन त्यांची रॅगिंग केली़ यामध्ये विद्यार्थ्यांना विवस्त्र करून शिवीगाळ करण्यात आली़ हा प्रकार एवढ्यावर थांबला नाही तर ट्युबलाईट अंगावर फोडण्याचीही धमकी देण्यात आली़ तर काहींना मारहाण करण्यात आली़ हा प्रकार रात्रीच मुदस्सर यांने कुटूंबियांना व महाविद्यालय प्रशासनाला कळविताच रविवारी सकाळी उघड झाला़ त्यानंतर ज्या तीन विद्यार्थ्यांना मुदस्सर याने ओळखले त्यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली़ तर या प्रकरणाची अ‍ॅन्टी रॅगिंंग समितीकडे सुध्दा तक्रार करण्यात आलेली आहे.आणि.. महाविद्यालयातून प्रवेश केला रद्दमुदस्सर इनामदार याने रविवारी पहाटेच कुटूंबियांना रॅगिंंगची माहिती दिल्यानंतर वडील मुख्तार व भाऊ डॉ़ मुजक्कीर यांनी सकाळीच जळगाव गाठले़ नंतर अ‍ॅन्टी रॅगिंग समितीकडे तक्रार करून पोलिसातही माहिती दिली़ दरम्यान, मुलासोबत घडलेला प्रकार हा पुन्हा होऊ शकतो, या भितीने वडील मुख्तार यांनी मुलाचा प्रवेश महाविद्यालयातून काढून घेण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार सोमवारी दुपारपर्यंत प्रवेश रद्दची प्रक्रिया पुर्ण करून मुदस्सर हा वडील व भावासह परभणीच्या दिशेने परतला.सात दिवसांच्या आत अहवाल पाठविणाररॅगिंगबाबत पालकाची तक्रार प्राप्त झाल्यामुळे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ़ शोएब शेख यांनी सोमवारी एमआयडीसी पोलिसांची भेट घेवून संपुर्ण प्रकाराची माहिती दिली़ आणि सात दिवसांच्या आत महाविद्यालयाकडून चौकशी अहवाल सादर करण्यात येईल, असेही त्यांनी पोलिसांना सांगितले़ तसेच हा चौकशी अहवाल हा अ‍ॅन्टी रॅगिंग समितीकडे व विद्यापीठाकडे पाठविण्यात येणार असल्याचेही डॉ़ शोएब शेख यांनी सांगितले़ विशेष म्हणजे, वसतिगृहात २८ नव्हे तर फक्त १७ विद्यार्थी असल्याचा महाविद्यालयाने दावा केला आहे.डॉक्टर बनविण्याचे स्वप्न भंगलेमुलाला डॉक्टर बनविण्याचे स्वप्न पाहीले होते़ काबाडकष्ट करून मुलांचे शिक्षण केले़ मुलाचा इकरा युनानी महाविद्यालयात क्रमांक लागला़ परंतु, पहिल्याच दिवशी मुलासोबत रॅगिंगचा प्रकार घडला आणि तो भेदरला गेला़ पुन्हा असा प्रकार घडून बरे-वाईट झाले तऱ या भितीने महाविद्यालयातून मुलाचा प्रवेश रद्द करून घेतला आहे़ दरम्यान, या प्रकारामुळे मुलाचे शैक्षणिक नुकसान तर झालेच पण मुलाला डॉक्टर होण्याचे पाहीलेले स्वप्नही भंगले, असल्याच्या भावना मुदस्सर याचे वडील मुख्तार इनामदार यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केले़ मुळगावी पोहचल्यावर पुढील शिक्षणाबाबत निर्णय घेवू असेही त्यांनी सांगितले़ 

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव