खोटी साक्ष दिली म्हणून तक्रारदाराला दोन महिने सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:17 IST2021-03-27T04:17:18+5:302021-03-27T04:17:18+5:30

जळगाव : न्यायालयात खोटी साक्ष दिली म्हणून तक्रारदाराला दोन महिने सश्रम कारावासाची व पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ...

Complainant was sentenced to two months rigorous imprisonment for giving false testimony | खोटी साक्ष दिली म्हणून तक्रारदाराला दोन महिने सश्रम कारावास

खोटी साक्ष दिली म्हणून तक्रारदाराला दोन महिने सश्रम कारावास

जळगाव : न्यायालयात खोटी साक्ष दिली म्हणून तक्रारदाराला दोन महिने सश्रम कारावासाची व पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी. भंसाली यांनी हा निकाल दिला असून, विशाल पंडित सोनवणे, असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.

विशाल सोनवणे याला आधार कार्ड काढावयाचे असल्यामुळे तो बोदवड येथील अधिकृत महा- ई- सेवा केंद्रात गेला होता. तेथील नीलेश देशमुख व चंद्रकांत महाजन यांनी आधार कार्ड काढण्यासाठी १६० रुपयांची लाचेची मागणी केली असल्याची तक्रार विशाल याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. तक्रारीवरून सापळा रचून कारवाई करण्‍यात आली. नंतर भुसावळातील जिल्हा व सत्र न्यायालयात खटला सुरू झाला. या प्रकरणातील तक्रारदाराची साक्ष नोंदविण्‍यात आली. खोटी साक्ष दिल्यामुळे मागील वर्षी जानेवारी महिन्यात खटला निर्दोष केला गेला. दरम्यान, तक्रारदाराने खोटी साक्ष दिल्यामुळे त्याच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्‍यात आला. अखेर गुरुवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी. भंसाली यांनी ‍फितूर तक्रारदार विशाल सोनवणे यास दोषी ठरवून त्यास २ महिने सश्रम कारावास व पाचशे रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

Web Title: Complainant was sentenced to two months rigorous imprisonment for giving false testimony