बालाजी विद्यालयात जन्माष्टमी निमित्ताने स्पर्धां
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:36 IST2021-09-02T04:36:32+5:302021-09-02T04:36:32+5:30
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उमेश करोडपती सचिव डॉ. सचिन बडगुजर मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील, प्रदीप भावसार व आदि शिक्षक ...

बालाजी विद्यालयात जन्माष्टमी निमित्ताने स्पर्धां
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उमेश करोडपती सचिव डॉ. सचिन बडगुजर मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील, प्रदीप भावसार व आदि शिक्षक उपस्थित होते. भारतीय संस्कृतीतील परंपरा आजही कायम ठेवून भारताने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे व संस्कृतीचेही जतन केले. यामुळेच भारताने सर्व क्षेत्रात प्रगती केली, असे प्रतिपादन उमेश करोडपती यांनी केले. यानिमित्त विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन खालीलप्रमाणे करण्यात आले.
चित्रकला स्पर्धेत
शाहद अली मुसलमान, आर्यश प्रकाश कोठावदे, श्रेया नीलेश बागड, मनस्वी अर्जुन पाटील, योगेश्वरी हेमंत पाटील,चारवी प्रवीण चौधरी, यश प्रवीण नावरकर,धनश्री संजय पाटील, मानस संदीप सोनवणे, ओम अरुण महाजन, योगीराज ईश्वर राठोड, पूर्वा नीलेश बागड आदी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित कंसारा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.