मृत बालकाच्या कुटुंबीयांना भरपाईची द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:22 IST2021-02-27T04:22:23+5:302021-02-27T04:22:23+5:30
जळगाव : आसोदा रेल्वे गेटजवळील एका आदिवासी बालकाला कुत्र्यांनी फरपट नेऊन या हल्ल्यात या आठ महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला ...

मृत बालकाच्या कुटुंबीयांना भरपाईची द्या
जळगाव : आसोदा रेल्वे गेटजवळील एका आदिवासी बालकाला कुत्र्यांनी फरपट नेऊन या हल्ल्यात या आठ महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात मृत बालकांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची आर्थिक मदत करावी आणि कुठलीही नोंद न केल्यामुळे आयुक्तांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणी विष्णू घोडेस्वार यांनी केली आहे.
घोडस्वार यांनी याबाबत राष्ट्रीय अनुसूचित आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांची भेट घेऊन निवेदन दिले. या आधिही आपण जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी दिली होती, अशी माहितीही घोडेस्वार यांनी दिली आहे. हे अत्यंत गरीब कुटुंब असून या हृदयद्रावक घटनेने त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, महापालिकेने याबाबत पोलीसात कुठलीही नोंद न करता, कुठलाही पंचनामा न करता, शिवविच्छेदन न करता या बालकाचा दफनविधी उरकून टाकल्याची बाब गंभीर असल्याचे घोडेस्वार यांनी म्हटले आहे.