जळगाव : जळगावातील औद्योगिक वसाहतीमधील एका प्लॅस्टिक प्रक्रियेच्या कंपनीला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही आग लागली. औद्योगिक वसाहतमध्ये असलेल्या आशीर्वाद प्लॅस्टिक या कंपनीला अचानक आग लागली. त्या वेळी पळापळ झाली. काही वेळाने अग्नीशमन दलाचे बंब आले व आग विझविण्यात आली. चार बंबाद्वारे ही आग नियंत्रणात आणण्यात आली. शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.
जळगावातील औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनीला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 12:10 IST