महिला बचत गटांच्या वस्तू भांडारचा २१ रोजी शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:21 IST2021-08-20T04:21:48+5:302021-08-20T04:21:48+5:30
फैजपूर, ता. यावल : सातपुडा विकास मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र पालतर्फे आयोजित महिला बचत गट निर्मित वस्तू ...

महिला बचत गटांच्या वस्तू भांडारचा २१ रोजी शुभारंभ
फैजपूर, ता. यावल : सातपुडा विकास मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र पालतर्फे आयोजित महिला बचत गट निर्मित वस्तू विक्री केंद्र ‘सरस्वती वस्तू भांडार’चा शुभारंभ २१ रोजी होणार आहे. उद्घाटन आमदार शिरीष चौधरी करतील.
आमदार चौधरी यांच्या संकल्पनेतून महिला बचत गटांना त्यांनी निर्माण केलेल्या वस्तू व खाद्यपदार्थांची वर्षभर विक्री करता यावी म्हणून फैजपूर येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयासमोर कायम वस्तू विक्री केंद्राची उभारणी केली आहे. या विक्री केंद्रावर महिला बचत गटांना त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंची व खाद्य पदार्थांची वर्षभर विक्री करता येईल. या समारंभास जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका पदाधिकारी, शासकीय अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, प्रगतीशील शेतकरी उपस्थित राहणार आहेत.