आत्महत्या करीत असल्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:19 IST2021-09-21T04:19:48+5:302021-09-21T04:19:48+5:30

मुलाला फोन करून कळविले... अंतुर्ली : शेतमजुराने घेतला गळफास पाचोरा : कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधून ...

Of committing suicide | आत्महत्या करीत असल्याचे

आत्महत्या करीत असल्याचे

मुलाला फोन करून कळविले...

अंतुर्ली : शेतमजुराने घेतला गळफास

पाचोरा : कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधून शेतमजुराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील अंतुर्ली खुर्द प्र.पा. येथे रविवारी पहाटे घडली. तत्पूर्वी या मजुराने आपण आत्महत्या करीत असल्याचे मुलाला फोन करून कळविले होते.

ईश्वर भिकन गोसावी (५७) असे या इसमाचे नाव आहे. रविवारी सकाळी ४ वाजता राहत्या घरी एकटा असल्याने छताला दोरी लावून गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी दि. १८ रोजी घरची मंडळी मुलांसह सासुरवाडीला तारखेडा येथे गेलेली होती. गळफास घेण्यापूर्वी ईश्वरने त्याचा मुलगा गणेश गोसावी यास फोनवर आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. तेव्हा मुलानेही 'असे का करता? आत्महत्या करू नका' म्हणून विनंती केली आणि तातडीने मुलगा व आईने अंतुर्ली गाठले. घरी येताच गळफास घेतलेल्या अवस्थेत पतीला पाहताच पत्नी व मुलाने हंबरडा फोडला. तात्काळ ईश्वर यास पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तिथे त्यास मृत घोषित करण्यात आले. याबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

Web Title: Of committing suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.