खुर्ची’साठी आयुक्तांची पळापळ
By Admin | Updated: October 8, 2015 00:34 IST2015-10-08T00:34:02+5:302015-10-08T00:34:02+5:30
धुळे : भूसंपादनाच्या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानंतर मोबदला न दिल्याने आयुक्तांच्या खुर्चीवर जप्तीची नामुष्की ओढावली होती. मात्र ती टाळण्यात आयुक्त यशस्वी झाले.

खुर्ची’साठी आयुक्तांची पळापळ
धुळे : भूसंपादनाच्या एका प्रकरणात न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही जागामालकाला न्यायालयाच्या आदेशानंतरही मोबदल्याची रक्कम अदा न केल्याने मनपा आयुक्तांच्या खुर्चीवर जप्तीची नामुष्की आली. मात्र जप्तीच्या वेळी काढता पाय घेऊन नंतर उपायुक्तांमार्फत वेळीच खुलासा केल्याने आयुक्तांना बुधवारी ही नामुष्की टाळण्यात यश आले. या जप्तीसाठी बुधवारी दुपारी एक वाजता मनपात दावेदार महादेव दगडू शेवतकर यांचे वकील एम.बी. पाचपोळ आणि न्यायालयाचे कर्मचारी दाखल झाल़े मात्र ही माहिती समजताच मनपा आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांनी काढता पाय घेतला. त्यांना व्हरांडय़ातच दावेदाराच्या वकिलांनी अडविलेसुद्धा. मात्र आपण काही वेळातच परत येतोय असे सांगून त्यांनी काढता पाय घेतला आणि नंतर उपायुक्त प्रदीप पठारे यांच्यामार्फत वेळेच्या आत खुलासा करताना मनपाचे बँक खाते गोठविण्यात आले असून ते सुरू होताच 50 टक्के रक्कम भरण्याचे लेखी आश्वासन दावेदाराला दिले आह़े 1 दावेदारांचे वकील पाचपोळ हे न्यायालयाचे बेलिफ व तक्रारदार शेवतकर यांच्यासोबत मनपात दाखल झाल़े मात्र ही माहिती मिळताच आयुक्त डॉ.भोसले यांनी काढता पाय घेतला़ आयुक्त दालनाबाहेर निघताच दालन कुलूप बंद करण्यात आल़े आयुक्त निघून गेल्याने व दालन कुलूप बंद करण्यात आल्याने खुर्ची जप्तीची कारवाई न करताच पथकाला परतावे लागल़े 2 नंतर उपायुक्त प्रदीप पठारे यांनी तत्काळ लेखी खुलासा दिला असून त्यात मनपाचे अॅक्सिस बँकेचे खाते गोठविण्यात आले असून त्यावरील व्यवहार सुरू होताच 50 टक्के रक्कम भरणार असल्याचे नमूद केले आह़े