जीएमसीत दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:37 IST2021-09-02T04:37:55+5:302021-09-02T04:37:55+5:30
खासगीत सिझेरियन, शासकीयमध्ये नॉर्मल - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एप्रिल ते जुलै २०२१ पर्यंत १७८ महिलांनी मुलांना जन्म ...

जीएमसीत दिलासा
खासगीत सिझेरियन, शासकीयमध्ये नॉर्मल
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एप्रिल ते जुलै २०२१ पर्यंत १७८ महिलांनी मुलांना जन्म दिला आहे.
- यात गेल्या महिनाभरात नॉन कोविड यंत्रणा सुरू झाल्यानंतर १३५ सिझेरियन, तर २१० नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या आहेत.
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापेक्षा खासगीत सिझेरियनचे प्रमाण अधिक आहे. एका घटनेनुसार एका महिलेला एका खासगी रुग्णालयात सुरुवातीला सिझेरियन करावे लागेल असे सांगण्यात आले होते. मात्र, हीच महिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल झाल्यानंतर या ठिकाणी या महिलेची सामान्य प्रसूती होऊन माता व बाळ दोघेही सुखरूप आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी असते. मात्र, या ठिकाणी चांगल्या प्रकारे सल्ला व उपचार मिळतात. गरिबांना मोठा दिलासा मिळतो.
- महिलेचे नातेवाईक
माझ्या पत्नीला एका खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर सुरुवातीला सिझेरियन करावे लागेल, असे सांगण्यात आले होते. आम्ही जळगाव सिव्हिलला आल्यानंतर याठिकाणी दाखल करून दोन दिवसांनी नॉर्मल डिलिव्हरी झाली. शिवाय चांगले उपचार मिळाले.
- महिलेचा पती
कोविडच्या काळात ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोविडचे उपचार केले जात होते. मात्र, काही ठिकाणे नॉन कोविड यंत्रणा सुरू होती, त्यातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय याठिकाणी बाधित व संशयित महिलांच्या प्रसूती झाल्या. आता नॉन कोविड यंत्रणा पूर्वपदावर आली आहे. शिवाय तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज आहे.
- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक