भुसावळ येथे बियाणी पब्लिक स्कूलमध्ये रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 19:10 IST2018-12-22T19:07:25+5:302018-12-22T19:10:14+5:30

राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनांंतर्गत २१ रोजी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम झाले.

A colorful cultural program at Biyani Public School, Bhusawal | भुसावळ येथे बियाणी पब्लिक स्कूलमध्ये रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम

भुसावळ येथे बियाणी पब्लिक स्कूलमध्ये रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम

ठळक मुद्देवार्षिक स्नेहसंमेलनात विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रमकार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला वावराज्यस्तरीय नाटिकेतून समाज प्रबोधनाचा संदेशमान्यवरांनी भाषणातून केले गुणी विद्यार्थ्यांचे कौतुकविशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळ, जि.जळगाव : राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनांंतर्गत २१ रोजी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी व संस्थाध्यक्ष मनोज बियाणी, सचिव संगीत बियाणी, विनोद बियाणी, स्मिता बियाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वालन करण्यात आले. अध्यक्षांंच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात विविध लोकगीत, तांडव नृत्य, वेस्टर्न स्टाईल, फॅशन शो असे रंगारंग कार्यकमम विद्यार्थ्यांनी सादर केले.
विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. तसेच राज्यस्तरीय निवड झालेल्या नाटिकेचे प्रदर्शन करून समाज प्रबोधनाचा संदेश देण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Web Title: A colorful cultural program at Biyani Public School, Bhusawal