पंढरीतील मुक्ताई मठात रंगला भक्तीचा रंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:11 IST2021-07-23T04:11:46+5:302021-07-23T04:11:46+5:30
सावदा (ता. रावेर) : पंढरपुरात मुक्ताई पालखीचा विसावा असलेल्या मुक्ताई मठात वारकरी आध्यात्मिक कार्यक्रमांची लयलूट करीत आहेत. गुरुवारी ...

पंढरीतील मुक्ताई मठात रंगला भक्तीचा रंग
सावदा (ता. रावेर) : पंढरपुरात मुक्ताई पालखीचा विसावा असलेल्या मुक्ताई मठात वारकरी आध्यात्मिक कार्यक्रमांची लयलूट करीत आहेत. गुरुवारी मठात भिंत चालवली मुक्ताईने या योगी चांगदेव महाराजांच्या गर्वहरण प्रसंगावर सजीव देखावा करून मुक्ताई मठात संत भक्तीचा उत्साह रंगला होता.
गेल्या चार दिवसांपासून श्री विठ्ठलाच्या पंढरीत विसावलेल्या संत मुक्ताबाई आषाढी पालखी सोहळ्यातील वारकरी श्री विठ्ठलाच्या सान्निध्याचा अपूर्व आनंद लुटत आहेत. पंढरीत प्रवेश, नगरप्रदक्षिणा, चंद्रभागा स्नान, श्री विठ्ठलासाठी मुक्ताईचा दैनंदिन नैवेद्य आदी सेवाही करीत आहेत. भजन, कीर्तन, निरूपण, अभंग, हरिपाठ व भारूड करून भक्तिरसात दंग आहेत. गुरुवारी भजनाचा रंग चढलेल्या महिला व पुरुष वारकऱ्यांनी फुगडीचा आनंदही घेतला.
या भक्तिरसात मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, पंजाबराव पाटील, प्रतिभा पाटील, सम्राट पाटील, श्रद्धा पाटील, मीना पाटील, नीळकंठ मारके, धनंजय मारके, उद्धव जुनारे, रवींद्र हरणे, बाळकृष्ण माहेर, विशाल खोले, अमोल पाटील, विजय खवले, दीपक पाटील, लखन पाटील, संजय पाटील, महादेव खोडके, महेश पाटील, ज्ञानेश्वर हरणे, राजेश पाटील, लक्ष्मण वाघोदे, विश्वंभर तिजारे, प्रमोद महाजन, समाधान पिंपळे, संदीप मोतेकर, पद्मनाथ पाटील, शेखर वानखेडे, रतीराम नागरूत, नरेंद्र नारखेडे, पंकज पाटील, अमोल पाटील, शंकरराव संबारे, अजाबराव पाटील, ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्र भारंबे, प्रदीप पाटील, संतोष पाटील, विजय झोपे तसेच शासकीय प्रतिनिधी तथा निवासी नायब तहसीलदार प्रदीप बी. झांबरे , नि.ना.तह, गौरव अ.पाटील, भागवत पाटील, सोबत जळगाव पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद कोळी, विजय शिंदे, लक्ष्मण पाटील, विशाल पाटील तर एसटी महामंडळाकडून गोकुळ केऱ्हाळे व आरोग्य विभागाकडून डॉ. राठोड यांचा वारीत सहभाग आहे.