महाविद्यालयांना शुल्क भरण्यास सवलत द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:20 IST2021-09-24T04:20:13+5:302021-09-24T04:20:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे पालक आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. त्यामुळे सहा टप्प्यात महाविद्यालयीन शुल्क भरण्याची सवलत देण्यात ...

महाविद्यालयांना शुल्क भरण्यास सवलत द्यावी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे पालक आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. त्यामुळे सहा टप्प्यात महाविद्यालयीन शुल्क भरण्याची सवलत देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने एसएसबीटी महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कोरोनामुळे कुणाचा रोजगार बुडाला, तर कुणाचा व्यवसाय ठप्प झाला. निर्बंधामध्ये शिथिलला मिळाल्यामुळे सर्व परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, अजूनही पालक आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे या सर्वांचा विचार लक्षात घेऊन महाविद्यालयीन शुल्क भरण्यासाठी महाविद्यालयाने सहा टप्पे करून द्यावे, अशी मागणी प्राचार्य डॉ. के. एस. वाणी यांना निवेदनामार्फत करण्यात आली. तसेच प्रवेशाची अंतिम तारीख वाढवून देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी नगर मंत्री आकाश पाटील, अभिषेक कोपूल व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.