महाविद्यालयाने पगार द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:21 IST2021-09-15T04:21:58+5:302021-09-15T04:21:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एसएमआयटी, जळगावमध्ये शिपाई पदावर कार्यरत असलेले प्रकाश धर्मा बाविस्कर यांचे मार्च २०१६ पासूनचे वेतन ...

महाविद्यालयाने पगार द्यावा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एसएमआयटी, जळगावमध्ये शिपाई पदावर कार्यरत असलेले प्रकाश धर्मा बाविस्कर यांचे मार्च २०१६ पासूनचे वेतन त्यांच्या बँक खात्यात जमा करावे, अशी मागणी बाविस्कर यांच्या पत्नी सुरेखा प्रकाश बाविस्कर यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. पगाराच्या मागणीकडे अध्यक्ष रवींद्र पाटील आणि प्राचार्य हे दुर्लक्ष करत असल्याचे बाविस्कर यांनी म्हटले आहे.
सुरेखा बाविस्कर यांनी निवेदनात म्हटले की, प्रकाश बाविस्कर यांची प्रकृती बरी नसल्याने उपचाराच्या खर्चासाठी त्यांच्या वेतनाची रक्कम त्यांना मिळावी. याबाबत वेळोवेळी शासकीय अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार देखील केला आहे. ’
कोट - महाविद्यालय हे २०१६ पासूनच बंद आहे. तसेच संबधितांना मी उद्याच भेटणार आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे त्याबाबत फार काही बोलता येणार नाही - ॲड. रवींद्र पाटील, अध्यक्ष, एसएमआयटी