महाविद्यालयीन तरुणीचा चाळीसगावला खून
By Admin | Updated: July 5, 2017 04:11 IST2017-07-05T04:11:31+5:302017-07-05T04:11:31+5:30
: एका २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा राहत्या घरातच खून झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री चाळीसगाव शहरात उघडकी

महाविद्यालयीन तरुणीचा चाळीसगावला खून
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव (जि. जळगाव) : एका २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा राहत्या घरातच खून झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री चाळीसगाव शहरात उघडकीस आली. याप्रकरणी तरुणीच्या प्रियकराला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
रेल्वे स्टेशन पलिकडच्या भागातील शिवकॉलनीत राहणाऱ्या सायली अनिल पाटील (२०) हिचा मृतदेह रात्री रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तिच्या आईला आढळला. ती घरात एकटीच होती. बाहेर गेलेली आई व भाऊ परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. रात्री साडेआठ ते साडेअकराच्या दरम्यान हा प्रकार घडला असून सायलीच्या डोक्यावर मारहाणीच्या खुणा होत्या. घटनास्थळावरून पोलिसांनी बॅट ताब्यात घेतली असून बॅटनेच हा खून झाल्याची शक्यता आहे़