भुसावळात सोनोग्राफी केंद्राची जिल्हाधिका:यांकडून तपासणी
By Admin | Updated: April 1, 2017 19:34 IST2017-04-01T19:34:43+5:302017-04-01T19:34:43+5:30
भुसावळ शहरात अचानक भेट देत बद्री प्लॉट भागातील मुक्ताई हॉस्पीटलला भेट देत कागदपत्रांची तपासणी केल्याने शहराच्या वैद्यकीय वतरुळात खळबळ उडाली़

भुसावळात सोनोग्राफी केंद्राची जिल्हाधिका:यांकडून तपासणी
भुसावळ : जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी शनिवारी भुसावळ शहरात अचानक भेट देत बद्री प्लॉट भागातील मुक्ताई हॉस्पीटलला भेट देत कागदपत्रांची तपासणी केल्याने शहराच्या वैद्यकीय वतरुळात खळबळ उडाली़
रुग्णालयासह कागदपत्रांची पाहणी
निंबाळकर यांनी रुग्णालयात होणा:या सोनोग्राफी केंद्राची तसेच त्यासाठी अद्ययावत रेकॉर्ड आहे वा नाही याची पाहणी केली तसेच बायोमेडिकल वेस्टेज, नर्सिग रजिस्ट्रेशन, कुटुंब कल्याण रेकॉर्ड, एनआयसीयू, ऑपरेशन थिएटरची पाहणी केली़
कागदपत्रे तपासणी दरम्यान काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आल़े मात्र जिल्हाधिका:यांनी स्वत: या रुग्णालयाची तपासणी केल्याने वैद्यकीय वतरुळात मोठी खळबळ उडाली होती़