जिल्हाधिकारीच 'वसाका'चे अवसायक

By Admin | Updated: June 16, 2014 12:42 IST2014-06-16T12:42:20+5:302014-06-16T12:42:20+5:30

वसंत साखर कारखान्यावर अवसायक म्हणून जिल्हाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा बँकेचे 'वसाका'कडील ५ कोटी रुपयांचे व्याजदेखील माफ होणार आहे.

The collector is the Vasacca driver | जिल्हाधिकारीच 'वसाका'चे अवसायक

जिल्हाधिकारीच 'वसाका'चे अवसायक

>एरंडोल : वसंत साखर कारखान्यावर अवसायक म्हणून जिल्हाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा बँकेचे 'वसाका'कडील ५ कोटी रुपयांचे व्याजदेखील माफ होणार आहे. 
पुणे येथील साखर आयुक्त विजय सिंघल यांनी ही नियुक्ती केली आहे. ११ जानेवारी २00१ पासून वसंत साखर कारखाना हा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ताब्यात आहे. 
पिंपरखेड, ता. भडगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन अँड.विश्‍वासराव राघो भोसले यांनी याबाबत शासन दरबारी पाठपुरावा केला. 
अवसायक नियुक्तीच्या आदेशाविरुद्ध जिल्हा बँकेने औरंगाबाद खंडपीठात रिटपिटिशन दाखल करून २८-३-२00२ रोजी 'जैसे थे' आदेश मिळविला. कारखाना ताब्यात ठेवला पण सुरू केला नाही. यानंतर 'वसाका'च्या विक्रीसाठी चार वेळेस अयशस्वी प्रयत्न केले. 
दरम्यान, अवसायक नियुक्तीच्या विरोधात दाखल केलेली याचिका जिल्हा बँकेने १४ सप्टेंबर २00९ रोजी स्वत:हून काढून घेतली होती. 
अवसायकाच्या पुनर्नियुक्तीसाठी भोसले यांनी माजी केंद्रीय मंत्री विजय पाटील, माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील व डी.डी. बच्छाव (जळगाव) यांच्या समवेत मुख्यमंत्री, सहकारमंत्री व साखर आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले व चर्चा केली. 
भोसले यांनी ८ नोव्हेंबर १३ रोजी साखर आयुक्तांना कायदेशीर नोटीस पाठवून १४-३-२00२ च्या अवसायकाच्या आदेशाची पुनर्नियुक्ती करण्याची मागणी केली. त्यानुसार साखर आयुक्तांनी अवसायकाचे आदेश अंतिम करून जिल्हाधिकारी यांची नियुक्ती केली आहे. 'वसाका'ची मालमत्ता व दप्तराचा तत्काळ ताबा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (वार्ताहर)
 
■ 'वसाकाचे मूळ कर्ज १८ कोटी २३लाख रु. व त्यावर १४-३-२000 पर्यंतचे व्याज ५ कोटी असे एकूण २३कोटी रु. बँकेचे कर्ज कारखान्याकडे शिल्लक आहे. याशिवाय या पुढील व्याजाची आकारणी बंद होणार आहे. १४ मार्च २00२ रोजी साखर आयुक्त पुणे यांनी अवसायक म्हणून जिल्हाधिकारी यांची नियुक्ती केली होती. 

Web Title: The collector is the Vasacca driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.