शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिका:यांची खुर्ची व वाहन जप्ती टळली

By admin | Updated: February 17, 2017 23:29 IST

वाढीव मोबदला देण्यास टाळाटाळ : दोन दिवसात न्यायालयात रक्कम भरण्याचे आश्वासन

जळगाव : पाचोरा तालुक्यातील साजगाव-मोहाडी लघु पाटबंधारे योजनेसाठी 10 एकर जमीन संपादित करून त्याचा 38 लाख 74 हजार 528 रुपयांचा वाढीव मोबदला देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी न्यायालयाने जिल्हाधिका:यांची खुर्ची व वाहन जप्त करण्याचे आदेश दिले. मात्र दोन दिवसात रक्कम भरण्याचे आश्वासन जिल्हाधिका:यांनी दिल्यानंतर शेतक:यांनी कारवाई थांबविली. त्यामुळे खुर्ची व वाहन जप्तीची नामुष्की टळली.साजगाव-मोहाडी लघु पाटबंधारे योजनेसाठी 1 जानेवारी 1995 रोजी सिकंदर अमिर पिंजारी यांच्या मालकीच्या 10 एकर जमिनीचे भूसंपादन केले होते. शेतक:यांनी जिल्हा न्यायालयात वाढीव मोबदल्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यानुसार 2008 मध्ये जिल्हा न्यायालयाने शेतक:यांना वाढीव मोबदला देण्याचे आदेश शासनाला दिले होते. मात्र शासनाकडून वाढीव मोबदला देण्यासाठी टाळाटाळ होत होती. या संदर्भात शेतक:यांनी न्यायालयात पुन्हा अर्ज करून जिल्हाधिका:यांची खुर्ची व वाहन जप्त करण्याचे आदेश व्हावे अशी मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने वॉरंट काढले होते. या वॉरंटच्या अंमलबजावणीसाठी शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शेतकरी सिकंदर अमिर पिंजारी, युनूस पिंजारी, मन्सूर पिंजारी, अॅड.अशोक चौधरी व न्यायालयातील अधिकारी व कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. सुरुवातीला त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांची भेट घेऊन कारवाईची माहिती दिली. मुंडके यांनी शेतक:यांना दोन दिवस थांबण्याची विनंती केली. त्यानंतर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल या कार्यालयात आल्या. अॅड.अशोक चौधरी यांच्यासह शेतक:यांनी त्यांची भेट घेत न्यायालयाच्या आदेशाची प्रत त्यांना दाखविली. जिल्हाधिका:यांनी दोन दिवसात शेतक:यांच्या               मोबदल्याची रक्कम अदा करण्याचे आश्वासन दिले. शेतक:यांनी दोन दिवसांची मुदत दिल्यामुळे जिल्हाधिका:यांची खुर्ची तसेच वाहन जप्तीची नामुष्की टळली.टाळाटाळ करणा:यांवर कारवाई कराशेतक:यांच्या वाढीव मोबदल्याची रक्कम तीन महिन्यांपूर्वी शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविली आहे. त्या आशयाचे शासन आदेशदेखील आहेत. मात्र तीन महिने ही रक्कम देण्यासाठी टाळाटाळ कुणी केली या प्रकाराची चौकशी करावी. तीन महिन्याचे व्याज कुणी द्यावे त्याबाबतची माहिती स्पष्ट करून टाळाटाळ करणा:यावर कारवाई करावी, अशी मागणी अॅड.अशोक चौधरी यांनी केली.जमिनीचा मोबदला देण्याबाबत टाळाटाळ होत असल्याने आज न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांची खुर्ची व वाहन जप्तीसाठी आम्ही आलो होतो. मात्र दोन दिवसात रक्कम भरण्याचे आश्वासन जिल्हाधिका:यांनी दिले आहे. सोमवारी रक्कम न मिळाल्यास जप्तीची कारवाई आम्ही करणार आहोत.-अॅड.अशोक चौधरी, याचिकाकत्र्याचे वकील